पिंपरी (Pclive7.com):- मराठा आरक्षणासाठी संपूर्ण शासन व्यवस्थेसमोर खडे ठाकलेले मनोज जरांगे पाटील यांनी संपूर्ण राज्यातील वातावरण ढवळून काढले आहे. मराठा आरक्षणासाठी राज्यभर साखळी उपोषण केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून पिंपरी चिंचवडमधील पिंपळे निलख येथे आज (दि.२९) एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यावेळी पिंपळे निलख ग्रामस्थांच्या वतीने सक्रिय सहभाग नोंदविण्यात आला.

मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांना पाठींबा दर्शविण्यासाठी पिंपळे निलखगावामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आज एक दिवसाचे उपोषण करण्यात आले. पिंपळे निलख येथील मेन बस स्टॉप गणेशनगर येथे सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत उपोषण करण्यात आले.
समस्त ग्रामस्थांच्या पिंपळे निलख यांच्या वतीने व परिसरातील बंधु आणि भगिनी हे यावेळी उपस्थित होते. हे उपोषण सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.
























Join Our Whatsapp Group