पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे निलखमध्ये कै.ज्ञानोबा चोंधे प्रतिष्ठान आणि यशश्री महिला संस्था प्रायोजित आज दरवर्षीप्रमाणेच वसुबारस शुभमुहूर्तावर सुरेल संगीत दिवाळी पहाट वर्ष सोळावे आयोजित करण्यात आली. सौ.विजया वाणी, सौ.निरजा गोवर्धन, नंदिनी आकुज, नरेंद्र शास्त्री, गिरीश पाठक व अजित धामणकर या मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.

या कार्यक्रमाची सुरुवात उठा उठा हो सकळिक, वाचे स्मरा गजमुख या गणेश भुपाळीने झाली. प्रभात समयो पातला, आता जागवा विठ्ठला.. सुर नवा ध्यास नवा आणि सारेगमप फेम संज्योती जगदाळे हिने गोड आवाजात बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जिवेभावे गायलं.. Little champ छोट्या आरंभीने नाम आहे आदी अंती नाम सार.. तल्लीन होऊन म्हटले.
तुषार रिठे यांनी नादातुन या नाद निर्मितो श्रीराम जयराम जय जय राम म्हणत वातावरण नादमय केले. त्यानंतर संज्योती जगदाळे हिने आम्हां नकळे ज्ञान नकळे पुराण हे भक्ती गीत सादर केले. आरंभी ने सुंदर तान घेत रूपेरी वाळूत माडांच्या बनात नेले. गायिका संज्योती जगदाळे हिने मी मज हरपून गेले रे म्हणत ज्येष्ठांचे भान हरपून गेले. तुषार रिठे यांनी मुसाफिर हुं यारो म्हणत वेगळ्या दुनियेत नेले.
संभाजी, सुभेदार, जिजामाता अशा अनेक टीव्ही मालिकांतील टायटल गाणी आणि जाहिरात जइंगल्स गाणारी सुप्रसिद्ध गायिका आसावरी गोडबोले हिने आओ हुजुर तुमको सितारोंमें ले चलु सादर केले.
संज्योती जगदाळे हिने बाहोंमें चले आओ.. करत बहार आणली.. झिलमिल सितारोंका आंगण होगा..
क्या हुवा तेरा वादा.. कजरा मोहब्बतवाला..
चांदणं.. चांदणं झाली रात.. एकविरेची पहात होते वाट.. ही पोरगी साजुक तुपातली.. एक मेरी जोहराजबीं.. अशा अनेक फर्माईशी गाण्यांच्या तालावर महिला व नागरीकांनी नृत्य करीत आनंद घेतला.खुसखुशीत सुत्रसंचलन महेश गायकवाड यांनी केले.नितीन खंडागळे, अमित कुंटे, संतोष पवार,ऋतुराज कोरे,सागर रिठे, अभिजित यादव या वाद्यवृंदाने साथसंगत केली.
दिपावली निमित्त संतसेवक शामराव केदारी, अध्यक्ष आम्युनिशन फॅक्टरी किर्तन महोत्सव २०२४ आणि लगोरी असोसिएशन जनरल सेक्रेटरी श्री राजु गोसावी सर यांना विशेष सन्मानित करण्यात आले. पिंपळे निलख मधील नॅशनल गेममध्ये उत्तम कामगिरी केलेल्या सुकन्या शर्वरी कामठे, प्रणिता सरोदे, तपस्वी नवघण, वैष्णवी कांबळे, नम्रता वाघ यांचा सत्कार करुन कौतुक केले. भारतीय जनता युवा मोर्चा, पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष श्री संकेतदादा चोंधे यांनी दिवाळी शुभेच्छा दिल्या. माजी नगरसेविका आरतीताई चोंधे यांनी आभार मानले. कार्यक्रमाची सांगता झिंगाट या गीताने व सुरुची अल्पोपहाराने झाली.

























Join Our Whatsapp Group