पिंपरी (Pclive7.com):- पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर आज मंगळवारी (दि.२१) दोन तासांचा वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळा (एमएसआरडीसी) कडून देण्यात आली आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर ३५/५०० किमी अंतरावर हायवे ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टीमअंतर्गत गँट्री उभारण्याचे काम एमएसआरडीसीकडून केले जाणार आहे.

या कामासाठी मंगळवारी दुपारी १२ ते २ या वेळेत वाहतूक ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे या वेळेत मुंबईकडून पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक पूर्णत: बंद राहणार आहे. तर या कालावधीत मुंबईकडून पुण्याकडे जाणाऱ्या हलक्या वाहनांची वाहतूक शेडुंग फाटा येथून वळवून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ जुनापुणे- मुंबई द्रुतगती महामार्गावरील शिंग्रोबा घाटातून द्रुतगती मार्गाच्या मॅजिक पॉइंट येथे पुन्हा मुंबई -पुणे द्रुतगती मार्गावर मार्गस्थ करण्यात येणार आहे. गँट्री बसविण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर अर्थात दुपारी २ नंतर मुंबईकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक पूर्ववत होणार आहे.
Tags: पुणे मुंबई एक्स्प्रेस वे
























Join Our Whatsapp Group