पिंपरी (Pclive7.com):- वाकड येथील नवीन वाकड-हिंजवडी लिंक रोडचे सुशोभिकरण करण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल वाकडकर यांनी केली आहे.

विशाल वाकडकर यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ‘ड’ प्रभागातील स्थापत्य विभागास दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वाकड येथील नवीन वाकड – हिंजवडी लिंक रोडची दुरवस्था झालेली असून, काही ठिकाणी पदपाथही नाहीत. बऱ्याच ठिकाणी पेव्हींग ब्लॉक निघाले असून त्यावरून पायी चालणे जिकिरीचे झाले आहे.
दुभाजकावर असणाऱ्या झाडांची वेळेवर कटिंग केली जात नाही. रस्त्यावरील सर्व पथदिवे पूर्ण क्षमतेने चालू नसतात यामुळे रात्री वाहनचालकांना त्रासास सामोरे जावे लागत आहे. याच रस्त्यावर दुतर्फा ओपन जिमचे साहित्य बसविल्यास स्थानिक नागरिक, ज्येष्ठ, युवक यांनीही त्याचा फायदा होईल. त्यामुळे सदरील रस्त्याचे सुशोभिकरण करण्यात यावे अशी मागणी विशाल वाकडकर यांनी केली आहे.
Tags: विशाल वाकडकर