पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील विविध उद्योग समुह वातावरण पर्यावरणपुरक ठेवण्यासाठी, सुशोभिकरणासाठी तसेच आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करीत आहेत. त्यांच्या सहकार्यातून शहराचा कायापालट होण्यास वेळ लागणार नाही, असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी केले.

राष्ट्रीय स्वच्छता अभियानांतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि मिलेनियम सेमीकंडक्टर्स प्रायवेट लिमीटेड यांच्या संयुक्त विद्यमाने चिंचवड येथील ऑटो क्लस्टर सभागृहाच्या चौकात मेक इन इंडियाचे प्रतिक असलेल्या भव्य सिहांचे शिल्प उभारण्यात आले आहे, या शिल्पाचे उद्घाटन अतिरिक्त आयुक्त खोराटे यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
या उद्घाटन सोहळ्यास सह शहर अभियंता प्रमोद ओंभासे, कार्यकारी अभियंता प्रेरणा सिनकर, कार्यकारी अभियंता प्रेरणा सिनकर, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, मिलेनियम सेमीकंडक्टर प्रायवेट लिमिटेड उद्योग समुहाचे व्यवस्थापकीय संचालक हरेश अभीचंदानी, व्यवस्थापक सुनील देखमुख, मारूती गावडे, राहुल तुपटकर, हेमंत बधे, रवि पागार उपस्थित होते.
मिलेनियम सेमीकंडक्टर प्रायवेट लिमिटेड उद्योग समुहाने मेक इन इंडियाचे प्रतिक असलेल्या सिंहाच्या शिल्पाची उभारणी करून या परिसराला वेगळी ओळख निर्माण करून दिली असून येथील परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारीही त्यांनी उचलली आहे. त्यांचे अनुकरण करत शहरातील बाकीच्या उद्योग समुहांनीही शहरात विविध ठिकाणी किंवा उद्योग समुहाच्या आजूबाजूच्या परिसरात सुशोभीकरण करण्यास, परिसर स्वच्छ ठेवण्यास महापालिकेस हातभार लावावा, असे आवाहन विजयकुमार खोराटे यांनी यावेळी केले.
मिलेनियम सेमीकंडक्टर प्रायवेट लिमिटेड उद्योग समुहाचे व्यवस्थापकीय संचालक हरेश अभिचंदानी म्हणाले, राष्ट्रीय स्वच्छता अभियान या उपक्रमात सहभागी होण्यासाठी आम्हाला संधी दिल्याबद्दल पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आभार व्यक्त करतो. कंपनीतील प्रत्येक कर्मचाऱ्यांसाठी ही अभिमानाची बाब आहे. या शिल्पाची उभारणी करून आम्ही पिंपरी चिंचवड शहराच्या सौंदर्यात भर टाकण्याचा प्रयत्न केला असून पुढेही अशा विविध महापालिकेच्या उपक्रमांमध्ये सहभाग घेण्यास आनंद वाटेल, असेही ते यावेळी म्हणाले.
 
                                                                    



 
							








 
			   
			   
			   
			   
			  











 Join Our Whatsapp Group
                Join Our Whatsapp Group