पिंपरी (Pclive7.com):- कोकणातील देवगड येथे पिंपरी चिंचवड मधील फिरायला गेलेले ५ विद्यार्थी बुडाले असून यामध्ये चौघांचा मृत्यू झाला आहे. तर एकाचा शोध सुरू आहे. हि घटना आज (दि.०९) सांयकाळी घडली. निगडी येथील संकल्प सैनिकी स्कूल अकॅडमीची सहल देवगड येथे गेली होती. ज्यामध्ये ३५ जणांचा समावेश होता. बुडालेल्या विद्यार्थ्यांमध्ये ४ मुलींचा समावेश आहे. मृतांमध्ये अंकिता गालटे, अनिशा पडवळ, प्रेरणा डोंगरे आणि पायल बनसोडे यांचा समावेश आहे. तर राम डिचोलकर हा विद्यार्थी बेपत्ता आहे. दरम्यान, शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.
हे पाच जण समुद्रात अंघोळीसाठी गेले असताना ते बुडाल्याची माहिती समोर येत आहे. सर्व मृतदेह देवगड ग्रामीण रूग्णालयात हलविण्यात आले आहेत. स्थानिक पोलिसांच्या मदतीने शोधकार्य सुरू आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून दुःख व्यक्त..“सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड येथे पर्यटनासाठी गेलेल्या संकल्प सैनिक अकादमीच्या प्रशिक्षणार्थींचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी आहे. सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांकडून या घटनेची माहिती घेण्यात आली असून अन्य प्रशिक्षणार्थींना त्यांच्या घरी सुखरूप पोहचवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मृत्यू पावलेल्या प्रशिक्षणार्थींच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. समुद्र किनारी, डोंगर दऱ्यांमध्ये पर्यटनासाठी जाणाऱ्या सर्वांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे कळकळीचे आवाहन आहे.”– अजित पवार, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री पुणे


























Join Our Whatsapp Group