पिंपरी (Pclive7.com):- चिखली, कुदळवाडी परिसरात बिबट्या दिसल्याने एकच खळबळ उडाली आहे. आज (दि.२८) पहाटे साडेपाचच्या सुमारास देहू- आळंदी रोडवरील चिखली जवळ बिबट्या काही नागरिकांना दिसला आहे. तसेच सीसीटीव्ही मध्येही बिबट्या कैद झाला आहे.
पहाटे बिबट्या दिसल्यामुळे चिखली, कुदळवाडी परिसरात भीतीच वातावरण पसरले आहे. या बिबट्याला पकडण्यासाठी वन विभाग आणि चिखली पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. बिबट्याला जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू झाले असल्याची माहिती मिळत आहे.


























Join Our Whatsapp Group