पिंपरी (Pclive7.com):- भोसरी येथील डॉ. गायकवाड डायबेटीस सेंटरचा १६ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला. वर्धापनदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या छोटेखानी समारंभात उल्लेखनीय काम करणाऱ्या सहकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी पुरुषोत्तम सदाफुले, प्रा. दिगंबर ढोकले, डॉ. शंकर गायकवाड, रोहित खर्गे, डॉ. गायकवाड डायबेटीस सेंटरचे संचालक डॉ. अनु गायकवाड डॉ. स्नेहा गायकवाड , आदी उपस्थित होते. यावेळी पुरुषोत्तम सदाफुले आणि प्रा. दिगंबर ढोकले यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक डॉ. अनु गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. बाळासाहेब गरुड यांनी केले. आभार डॉ. गीतांजली गरुड यांनी मानले.





















Join Our Whatsapp Group