पिंपरी (Pclive7.com):- राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.
नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी आपल्या या दिनदर्शिकेच्या माध्यमातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारत असलेल्या विकसित भारतची महत्वपूर्ण घडामोडी मतदारसंघातील जनमानसात पोहचवण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे. नरेंद्र मोदी याच्या अभिनव कल्पनेतून सर्वंकष व सर्वसमावेशक आणि उपक्रमांच्या धोरणाशी संबंधित निर्णयांमुळे जागतिक व्यासपीठावर जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारताची खरी क्षमता आणि भूमिका समोर आली आहे.
जागतिक पातळीवर आपल्या धोरणांच्या माध्यमातून ठसा उमटवणाऱ्या देशातील महत्वपूर्ण घडामोडी या दिनदर्शिकेत नमूद करण्यात आले आहे जसे की अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिर निर्माण यशस्वीपणे पार पडलेली चंद्रयान-३ मोहीम, जलद रस्ते बांधकाम रेकॉर्ड, अटल बोगदा, प्रोजेक्ट टायगर,GPAI समिट, जी-२० परिषद आयोजन, उत्तराखंड ग्लोबल इन्व्हेस्टर समिट, शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण, नवीन संसद भवन, ३.७ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था आणि वंदे भारत ट्रेन इ. अश्या विविध उपक्रमद्वारे आपल्या विकासाच्या दृष्टीने देशाला नव्या उंचीवर पोहचवणारे आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि त्यांचे काम घराघरात पोहचवण्यासाठी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी संपूर्ण चिंचवड मतदारसंघात हे दिनदर्शिका पोहचवण्याचा निर्धार केला आहे. यावेळी बांधकाम व्यावसायिक राजुशेठ सांकला, कृष्णकुमार गोयल आणि इतर मान्यवर उपस्थित होते.