पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने विविध पदांच्या ३८७ जागांसाठी ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली. राज्यभरातील एकूण ९८ परीक्षा केंद्रांवर मोबाईल जॅमर बसविण्यास आले होते. त्यासाठी ४० लाख ३४ हजार इतका खर्च झाला आहे.
महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने राज्यभरातील विविध ९८ केंद्रावर ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली. ही परीक्षा २६, २७ व २८ मे २०२३ असे तीन दिवस झाली. तसेच, १७ जुलै २०२३ ला एका केंद्रावर परीक्षा घेण्यात आली. प्रत्येक परीक्षा केंद्रावर ईसीआयएल व बीईएल या कंपन्यांकडून मोबाईल जॅमर बसविण्यात आले होते.
त्यासाठी प्रती उमेदवार ४० रूपये दर निश्चित करण्यात आला होता. त्यानुसार जीएसटी कर धरून एकूण ४० लाख ३३ हजार ९९५ रुपये इतके बिल झाले आहे. ते बिल अदा करण्यात आले आहे. त्या खर्चास आयुक्त शेखर सिंह यांनी कार्योत्तर मान्यता दिली आहे.
























Join Our Whatsapp Group