पिंपरी (Pclive7.com):- अयोध्या राम नगरी येथे प्रभू श्रीराम जन्मभुमी प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. याचे औचित्य साधत तळवडे येथील सहयोगनगर येथे महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. हा उत्सव सोहळा मोठ्या आनंदाच्या वातावरणात येथे साजरा झाला. यावेळी सर्व नागरिकांनी प्रभू श्री रामचंद्रांच्या घोषणानी संपूर्ण पसरीसर दणाणून सोडला.
याप्रसंगी २१ दांपत्याच्या हातून ही महाआरती संपन्न झाली. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे उपविभाग अध्यक्ष देवेंद्र निकम, शाखा अध्यक्ष सागर सोनटक्के, नामदेव जेडगुले, वैभव पाटील, तन्मय इंगळे, वेदांत वराडे, ज्ञानेश्वर गुंड, करण कुचेकर, जयेश चौधरी व शिवपर्वती मित्र मंडळाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.
























Join Our Whatsapp Group