पिंपरी (Pclive7.com):- विवाहितेने दारू पिण्यासाठी पतीकडे वारंवार पैशांची मागणी करणाऱ्या विवाहितेच्या आणि तिच्या बहिणीच्या छळाला कंटाळून पतीने आत्महत्या केली. देहूरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. याप्रकरणी विवाहिता आणि तिच्या बहिणीला पोलिसांनी अटक केली आहे.
नारायण मधुकर निर्वळ (वय ३५) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. ज्ञानेश्वर मधुकर निर्वळ (३९, रा. सोमठाणा जि. परभणी) यांनी याप्रकरणी शनिवारी (दि. २०) देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी नारायण निर्वळ यांची पत्नी आणि तिची बहीण यांच्या विरोधात गुन्हा केला आहे.
नारायण निर्वळ ॲनिमेशन क्षेत्रात कार्यरत होते. एका कार्यालयातून ॲनिमेशनचा व्यवसाय करीत होते. त्यांच्या पत्नीला काही दिवसांपूर्वी ‘वर्क फ्रॉम’ मिळाले होते. दरम्यान, पत्नी आणि तिची बहीण यांनी त्यांच्याकडे दारू पिण्यास पैशांची मागणी केली. पत्नीची बहीणही चुकीच्या वर्तणुकीस प्रोत्साहन द्यायची. नारायण यांच्याशी वारंवार भांडणे करून मानसिक व शारीरिक त्रास देत असे. याला कंटाळून त्यांनी १७ जानेवारी रोजी घरी विषारी द्रव प्राशन केले. रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. वायसीएम रुग्णालयात शनिवारी (दि. २०) शवविच्छेदन झाले. नारायण निर्वळ यांनी त्रास होत असल्याबाबत भाऊ ज्ञानेश्वर निर्वळ यांना फोनवरून मेसेज केले होते. त्यावरून पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला. दोघींना अटक केली. पोलिस उपनिरीक्षक सोहन धोत्रे तपास करीत आहेत.
























Join Our Whatsapp Group