मुंबई (Pclive7.com):- माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. चंद्रशेखर बावनकुळे, देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश पार पडला आहे.
आत्तापर्यंत जे काही झालं ते झालं. आता मी माझ्या राजकीय कारकिर्दीची नवी सुरुवात करतो आहे असं अशोक चव्हाण यांनी म्हटलं होतं. आज त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे. काँग्रेसमध्ये असलेले अशोक चव्हाण यांनी सोमवारीच आपल्या आमदारकीचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर अशोक चव्हाण यांनी भाजपा प्रवेशाबाबत भाष्य केलं नव्हतं. आज अशोक चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थिती भाजपात प्रवेश केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जातो आहे.


























Join Our Whatsapp Group