पिंपरी (Pclive7.com):- महाशिवरात्रीनिमित्त भाविकांना घोराडेश्वराच्या दर्शनाला जाता यावे, यासाठी पीएमपीएमएलच्या वतीने निगडी येथून विशेष बस सोडण्यात येणार आहे. तसेच इतर बसही जाणार असून दर ते १० ते १५ मिनिटांनी बस सोडण्यात येणार आहेत. प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पीएमपी प्रशासनाकडून करण्यात आले.
महाशिवरात्रीला महादेवांच्या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होते. नागरिकांना दर्शनाला जाता यावे यासाठी निगडी (पवळे चौक) येथून घोरावाडेश्वर मंदिर पायथा (शंकरवाडी) पर्यंत बससेवा असेल. असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. निगडी (पवळे चौक) येथून घोरावाडेश्वर मंदिर पायथा (शंकरवाडी) येथे जाण्याकरीता पहिली फेरी पहाटे ०५.२० वाजता सुटेल. पर्यायी बसमार्ग क्रमांक ३०५, ३४१, ३४२, ३६८ व ३७१ या ०५ मार्गांवर एकूण २० बस सरासरी १० ते १५ मिनिटांनी उपलब्ध होणार आहेत.


























Join Our Whatsapp Group