पिंपळे सौदागर (Pclive7.com):- निरामय आयुष्य जगण्यासाठी कुठल्याही प्रकारचा आजार उद्भवल्यास ताबडतोब उपचार करा, आवश्यक त्या वैद्यकीय चाचण्या करा, शुध्द पाणी प्या, शरीराला झेपेल असा दररोज व्यायाम आणि योगासने करा असा सल्ला ह्रदय विकार, मधुमेह आणि थायराईड तज्ञ डॉ. हेमंत कुलकर्णी यांनी दिला. पिंपळे सौदागर येथील ऑल सिनियर असोसिएशन तर्फे आयोजित मासिक सभेत ते बोलत होते.
रविवार दि.२८ रोजी कुणाल आयकॉन रोडवरील बाळासाहेब कुंजीर क्रीडांगणावर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. असोसिएशनचे अध्यक्ष विलास जोशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात डॉ. हेमंत कुलकर्णी यांनी ज्येष्ठ नागरिकांना वाढत्या वयात आरोग्याबाबत घ्यावयाची काळजी आणि विविध आजाराबाबतचे उपचार याबाबत अतिशय सोप्या भाषेत मार्गदर्शन केले.
या मासिक सभेत एप्रिल महिन्यातील वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ नागरिकांसोबत माजी नगरसेवक शत्रृघ्न बापू काटे यांचे गुलाबपुष्प देऊन अभिष्टचिंतन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन श्रीकृष्ण निलेगावकर यांनी केले. असोसिएशनचे पदाधिकारी विलास जोशी, अनिल कुलकर्णी, रमेश चांडगे, सखाराम ढाकणे, शकुंतला शिंदे, जयपाल सिंदनाळे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

























Join Our Whatsapp Group