पिंपरी (Pclive7.com):- कामगारांची पिळवणूक करणार्या महालक्ष्मी संस्थेस काळ्या यादीत टाका अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा युवासेना शहर संघटक निलेश हाके यांनी दिला आहे. हाके यांनी यासंदर्भात पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे यांना निवेदन दिले आहे.
मे.महालक्ष्मी स्वयंरोजगार संस्था यांच्या वतीने हिंदू स्मशानभूमीमध्ये सफाई कामगार वर्ग सुरक्षारक्षक पुरवण्याचे काम करते. परंतु या संस्थेमार्फत कामगारांची पिळवणूक होत असून कामगारांना तुटपुंज्या पगारावर काम करून घेतले जाते. तसेच सदर कामगारांना त्यांचे मानधन त्यांच्या बँक खात्यावर न देता थेट हातात दिले जाते. सदर प्रकरणी कामगारांमध्ये अत्यंत निराशा असून याप्रकरणी वाचा फोडण्यास कोणी तयार नाही. तरी सदर संस्थेकडून कामगारांना यापूर्वीचा फरक देऊन कामगारांना न्याय द्यावा. दहा दिवसात त्याला काळ्या यादीत टाकावे. अन्यथा शिवसेना पद्धतीने लोकशाहीने आंदोलन केले जाईल अशी मागणी युवासेना शहर संघटक निलेश हाके यांनी केली आहे.

























Join Our Whatsapp Group