पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी येथील श्री. संदीप वाघेरे युवा मंचच्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांमध्ये रोजगार मेळावा व करिअर मार्गदर्शन व्याख्यानाचे तसेच प्रभाग क्रमांक २१ मधील गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा सत्कार समारंभ व गरीब गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप करण्यात येणार आहे. अशी माहिती मा. नगरसेवक संदीप वाघेरे यांनी दिली.
या विषयी अधिक माहिती देताना वाघेरे म्हणाले कि, सालाबादप्रमाणे याही वर्षी पिंपरी चिंचवड शहर व परिसरातील तरुणांसाठी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन मंगळवार दिनांक १८ जून २०२४ रोजी सकाळी ९ ते ५ यावेळेमध्ये संदीप वाघेरे यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या प्रांगणामध्ये करण्यात आले आहे. या मेळाव्यामध्ये पुणे जिल्ह्यातील १०० पेक्षा जास्त नामांकित कंपन्यांचा सहभाग राहणार असून इयता ५ ते पदवीधर शैक्षणिक अहर्ता असलेल्या १००० पेक्षा जास्त तरुणांना जागेवरच नियुक्ती पत्र देण्यात येणार आहे.
रोजगार मेळाव्यासाठी दिनांक ८ जून २०२४ ते १७ जून २०२४ पर्यंत https://shorturl.at/4TZW7 या लिंकवर नोंदणी करावी. तसेच मेळाव्याच्या दिवशी उमेदवाराने आपल्या कागदपत्रांचे किमान ५ प्रती सोबत आणाव्यात. तसेच मंगळवार दिनांक १८ जून २०२४ रोजी सायंकाळी ६.३० ते ८.३० यावेळेमध्ये प्रभाग क्रमांक २१ पिंपरी व परिसर येथील इयत्ता १० व १२ वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी लॅपटॉप,टॅब,व स्कूल बॅग तसेच इयत्ता ज्युनिअर केजी ते ८ वी च्या विद्यार्थ्यासाठी मोफत शालेय साहित्यांचे वाटप करण्यात येणार आहे.
कार्यक्रमादरम्यान महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्याख्याते वसंत हंकारे यांचे करिअर मार्गदर्शन व्याख्यानाचे आयोजन देखील करण्यात आलेले आहे. या उपक्रमाचा लाभ सर्व नागरिकांनी घ्यावा असे आवाहन माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी केले आहे.






















Join Our Whatsapp Group