पिंपरी (Pclive7.com):- तडीपार केलेला गुंड त्याचा तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वी शहरात आला. तसेच त्याने स्वतःकडे शस्त्र बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी त्याच्यावर कारवाई करत अटक केली आहे. ही कारवाई गुरुवारी (दि.६) दुपारी पावणेतीन वाजताच्या सुमारास तळवडे रोड, गणेशनगर, चिखली येथे करण्यात आली.
सुरज भगवान चोपडे (वय २१, रा. रुपीनगर, चिखली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पोलिस अंमलदार उद्धव खेडकर यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी सुरज चोपडे याला ६ एप्रिल २०२४ रोजी पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. त्याचा तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वी तो कोणतीही परवानगी न घेता शहराच्या हद्दीत आला. तसेच त्याने स्वतःकडे कोयता हे शस्त्र बाळगले. याबाबत माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखा युनिट दोनने सुरज चोपडे याला अटक केली.

























Join Our Whatsapp Group