लोणावळा (Pclive7.com):- लोणावळा येथील सहारा पुलाच्या समोरील डोंगरावर असलेल्या धबधब्यांच्या मागील बाजूला धोकादायकपणे डोंगरात फिरणाऱ्या ७ पर्यटकांवर वन विभागाने लोणावळा पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. तसेच टायगर पॉइंटवर हुल्लडबाजी करणाऱ्या ५ अशा एकूण १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वन कर्मचारी संदीप रामगुडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सहारा पूल परिसरात सुधर्म नितीन शेटे व संतोष पंडित (दोघेही राहणार भिलार ता. महाबळेश्वर जि. सातारा), दीनानाथ सुरेंद्र पासवान (रा. चारकोपमाय कोळीवाडा कांदिवली वेस्ट मुंबई), लवकुश सोहनलाल गुप्ता व रविकुमार बबलू कुमार गौतम (दोघेही रा. डिगेश्वर कांदिवली वेस्ट मुंबई), ऋषीकेश श्रीधरराव साळुंके (रा. दत्तनगर जि. बीड), तनमय अजय तेलवेणे (रा. बेदवाडा मुरबाड मुंबई) या सात पर्यटकांवर भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २२३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शनिवारपासून जोरदार पाऊस सुरू असल्याने धबधबे वहात आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव पोलिस व वन विभाग यांची संयुक्त गस्त सुरू होती. वनपाल एस. डी. चुटके, वन कर्मचारी संदीप रामगुडे, लोणावळा शहरचे पोलिस निरीक्षक सुहास जगताप, महिला पोलिस उपनिरीक्षक दीपाली पाटील मॅडम, पोलिस कॉन्स्टेबल पवन कराड, रईस मुलाणी यांचे पथक पेट्रोलिंग करत होते. पोलिस निरीक्षक सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार शकील शेख हे तपास करत आहेत.

टायगर पॉइंटवर हुल्लडबाजांवर गुन्हा दाखल..
हुल्लडबाजी करणाऱ्या पाच पर्यटकांवर टायगर पॉइंट परिसरात पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. जितेंद्र रमेश वाकळे (वय ३७, रा. पनवेल, रायगड), सागर रमेश वाकळे (३४, रा. भिवंडी, ठाणे), अंकुश रामचंद्र वाकळे (४३, रा. भिंवडी, ठाणे), हेमंत सुरेंद्र ढसाळ (३३, रा. भायखळा, मुंबई), किरण भासकर सोनावणे (३३, रा. चांदणी कोळीवाडा, ठाणे) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती लोणावळा ग्रामीणचे पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी दिली.
























Join Our Whatsapp Group