चिंचवड (Pclive7.com):- पोलीस फ्रेंड्स वेलफेअर असोसिएशनच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही चिंचवड पोलीस स्टेशन येथे पोलीस बांधवाना राख्या बांधून रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात आला.

यावेळी चिंचवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक (गुन्हे) दीपक गोसावी, चिंचवड वाहतूक विभागचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक शंकर डामसे, सागर आढारी, पोलीस फ्रेंड्स वेलफेअर असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष गजाननभाऊ चिंचवडे, सचिव शुभम चिंचवडे, स्वरूपाताई खापेकर, सायली साळवी, रेश्मा शिंदे, दामिनी झोपे, समिक्षा चौधरी, राणी भारंबे, राकेश सायकर, विनायक जगताप, श्रीकांत खुळगे, भगवान शिंदे, रामया हिरेमठ, रोहन भिसे, राजू बागडी, सुरेंद्र मालविया, उदय वाडेकर, अनिकेत वारके, जयेश महाजन, अनुज शहा, किरण अडागळे, प्रकाश मिर्झापुरे, मंगेश कवी आणि पोलीस बांधव व पोलीस भगिनी उपस्थित होते.
यावेळी गजाननभाऊ चिंचवडे म्हणाले की ऊन, वारा, पाऊस सोसत शहरातील रहदारी आणि गुन्हेगारीवर नियंत्रण राखणाऱ्या पोलीस बांधवांप्रती आपला स्नेह कायम राखून आदर व्यक्त करण्याचा प्रयत्न सर्वांनी केला पाहिजे. याच हेतूने पोलीस बांधवांना राखी बांधून त्यांच्यासोबत राखीपौर्णिमा साजरी करण्यात आली.






















Join Our Whatsapp Group