पिंपरी (Pclive7.com):- विजयादशमीनिमित्त उद्या शनिवार (दि.१२) रोजी पिंपरीगाव येथे भव्य ७० रावण दहन कार्यक्रमाचे आयोजन संदीप वाघेरे युवा मंचच्या वतीने करण्यात आले आहे. यावेळी आकर्षक फटाक्यांची आतिषबाजी तसेच मनोरंजनाच्या विविध कार्यक्रमाची मेजवानी देखील नागरिकांना अनुभवता येणार आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह आणि पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या हस्ते रावण दहनाचा कार्यक्रम संपन्न होणार असल्याची माहिती आयोजक माजी नगरसेवक संदीप वाघरे यांनी दिली आहे.

पिंपरी गाव येथील नवमहाराष्ट्र क्रीडांगण येथे उद्या शनिवार (दि.१२) रोजी सायंकाळी ६ वाजता या भव्य रावण दहन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, अश्विनी जगताप, अण्णा बनसोडे, अमित गोरखे, उमा खापरे, माजी खासदार अमर साबळे, भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप, ज्येष्ठ नेते आझम पानसरे, शिवसेना नेत्या सुलभा उबाळे, माजी नगरसेवक अजित गव्हाणे, राहुल कलाटे, तुषार कामठे, चंद्रकांत नखाते, शैलेश मोरे, राजेंद्र गावडे, सिद्धेश्वर बारणे, संदीप कस्पटे, विनोद नढे, सुरेश भोईर, शितल शिंदे, संतोष कुदळे, हर्षल ढोरे, नवनाथ जगताप, डब्बू आसवानी, शत्रुघ्न काटे, सचिन चिंचवडे, निलेश बारणे, सचिन साठे, माजी नगरसेविका गिरजा कुदळे, निकिता कदम, मीना नाणेकर, सुजाता पालांडे, सीमा सावळे, भीमा फुगे, माधुरी मुलचंदाणी, ज्योतिका मलकानी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.























Join Our Whatsapp Group