दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांची कन्या ऐश्वर्या जगताप रेणुसे यांनी पिंजून काढला काळेवाडी परिसर
चिंचवड (Pclive7.com):- दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी चिंचवड विधानसभा मतदारसंघ हा तळहाताच्या फोडा सारखा जपला होता. या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास हेच त्यांचे स्वप्न होते. आता त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी चिंचवड विधानसभेच्या सर्वांगीण विकासासाठी शंकर जगताप यांना प्रचंड मतांनी निवडून द्या असे साकडे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांची कन्या ऐश्वर्या जगताप रेणुसे यांनी घातले.

चिंचवड विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप यांच्या प्रचारार्थ दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांची कन्या ऐश्वर्या जगताप रेणुसे यांनी कंबर कसली आहे. भारतीय जनता पक्षातर्फे शंकर जगताप यांची उमेदवारी जाहीर होतात संपूर्ण कुटुंबाने स्वतःला प्रचारासाठी झोकून दिले आहे.
आज (दि.२३) ऐश्वर्या जगताप रेणुसे यांनी काळेवाडी परिसरातील मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. त्यांनी विठ्ठल रखुमाई कॉलनी, ज्योतिबा कॉलनी, ज्योतिबा नगर, काळेवाडी या परिसरात जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. यावेळी माजी नगरसेवक प्रमोद ताम्हणकर, नीताताई पाडाळे, भरत ठाकूर, विनोद तापकीर, सोमनाथ तापकीर, दीपक पंचबुद्धे, आकाश भारती, दत्ता कदम, भाऊसाहेब आडुळकर यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
मतदारांशी संवाद साधताना ऐश्वर्या जगताप रेणुसे म्हणाल्या की, स्वर्गीय लक्ष्मण जगताप यांनी चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न पाहिले होते. त्यात अनुषंगाने त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत या मतदारसंघाच्या विकासासाठी स्वतःला झोकुन दिले. सिमेंट काँक्रीटचे रस्ते, मुबलक पाणीपुरवठा या मूलभूत सुविधांकडे त्यांनी प्रामुख्याने लक्ष दिले.
आता स्वर्गीय आमदार लक्ष्मणभाऊ यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, चिंचवड विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप यांना प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहन ऐश्वर्या जगताप रेणुसे यांनी मतदारांना केले.
























Join Our Whatsapp Group