पंतप्रधानांच्या विचारांतून राष्ट्रप्रेम, जबाबदारी आणि अभिमानाची भावना अधिक दृढ..!
पिंपरी (Pclive7.com):- स्वच्छता, पर्यावरण, जैवविविधता, भाषा, संस्कृती, स्वदेशी उद्योग आणि आत्मनिर्भर भारत या विषयांवर सखोल मार्गदर्शन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “मन की बात” कार्यक्रमातून करतानाच राष्ट्रविकासाचा संदेश दिला असल्याचे भाजपा युवा मोर्चा पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष दिनेश यादव म्हणाले.

प्रत्येक भारतीयाशी थेट संवाद साधणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ या संवादात्मक कार्यक्रमाच्या १२७ व्या भागातून देशवासियांना संबोधित केले. हा प्रेरणादायी कार्यक्रम शहरातील सहकार्यांसोबत पाहून शहरासाठी अधिक चांगल्या प्रकारे काम करण्याची उर्मी मिळाली असल्याचे दिनेश यादव यांनी सांगितले. या कार्यक्रमावेळी प्रमुख उपस्थिती संघटन सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, माजी नगरसेवक विकास डोळस, वैशाली ताई खाड्ये, अजय पाताडे, संजय पटनी, संकेत चोंधे आणि अजित कुलथे यांची होती.
दिनेश यादव पुढे म्हणाले, आपल्या संवादातून पंतप्रधान मोदी यांनी समाजातील सकारात्मक बदल, जनसहभाग आणि राष्ट्रविकासासाठी देशभर चालू असलेल्या विविध उपक्रमांवर प्रकाश टाकला. या संवादात पंतप्रधानांनी स्वच्छता, पर्यावरण, जैवविविधता, भाषा, संस्कृती, स्वदेशी उद्योग आणि आत्मनिर्भर भारत या विषयांवर सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमाचा विशेष उल्लेख करत नागरिकांना पर्यावरण संवर्धनासाठी सक्रीय भूमिका बजावण्याचे आवाहन केले. तसेच स्वदेशी उत्पादनांना मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि आत्मनिर्भरतेच्या दिशेने देश करीत असलेल्या प्रयत्नांचे कौतुकही केले आहे यातून आम्हाला युवकांना नव प्रेरणा मिळत आहे.या प्रेरणादायी संवादातून पंतप्रधान मोदी यांनी प्रत्येक भारतीयाच्या मनात नवचैतन्य निर्माण केले असून त्यांच्या विचारांतून राष्ट्रप्रेम, जबाबदारी आणि अभिमानाची भावना अधिक दृढ झाली आहे. असेही यादव म्हणाले.

‘वंदे मातरम’च्या १५० व्या वर्षानिमित्त कार्यक्रमानिमित्त उत्साही सहभाग घेणार
पंतप्रधानांनी ओडिशातील कोरापुट कॉफी या स्थानिक उत्पादनाच्या जागतिक यशाचा उल्लेख करत भारतातील स्थानिक उद्योगांनी जागतिक स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी ७ नोव्हेंबर रोजी ‘वंदे मातरम’ गीताच्या १५० व्या वर्षानिमित्त देशभर आयोजित कार्यक्रमांमध्ये नागरिकांनी उत्साहाने सहभागी होण्याचे आवाहन केले. यामध्ये पिंपरी चिंचवड शहर भाजपा युवा मोर्चाच्या माध्यमातून घेऊन सहभागी होईल असे यादव म्हणाले.
























Join Our Whatsapp Group