
या खुनाबाबत चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. तपासादरम्यान पोलिसांनी तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुरावे गोळा केले असता चैतालीचा प्रियकर सिध्दार्थ दिपक पवार याचाही गुन्ह्यात सहभाग असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता दोघांमधील संबंध आणि खुनामागील कारणे समोर आली.

तपासात उघड झाले की, चैताली व सिध्दार्थ यांच्यात प्रेमसंबंध होते. मयत नकुल हा या नात्याच्या आड येत असल्याने दोघांनी त्याचा काटा काढण्याचे ठरवले. दि. २३ ऑक्टोबर रोजी नकुलला चैतालीने घेतलेल्या कर्जाची माहिती मिळाल्याने दोघांमध्ये वाद झाला. त्या वेळी नकुलने चैतालीला मारहाण केली. त्याचा राग आल्याने सिध्दार्थ पवार आणि चैताली भोईर यांनी मिळून नकुलचा गळा आवळून खून केला.
या गुन्ह्या प्रकरणी पत्नी चैताली भोईरला २४ ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली होती, तर तिचा प्रियकर सिध्दार्थ पवार याला पोलिसांनी दि.२९ ऑक्टोबर २०२५ रोजी अटक केली. चिंचवड पोलिसांचा तपास सुरू असून या प्रकरणाने चिंचवड परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
























Join Our Whatsapp Group