पिंपरी (Pclive7.com):- निगडी प्राधिकरणातील सेक्टर नं.२६ आकुर्डी रेल्वे स्टेशन, बीएसएनएल ऑफिस शेजारी हरित सेतूचे काम सुरू असताना निष्काळजीपणामुळे वृक्षाचा बळी गेला आहे.

हरित सेतूच्या कामात रात्री झाड पडले. रात्रीपासून संपूर्ण रस्ता बंद झाला. महानगरपालिकेने पंचनामा करून संबंधितांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी माजी नगरसेवक अमित गावडे, महापालिका वृक्ष प्राधिकरण समितीचे माजी सदस्य नंदकुमार सातुर्डेकर, अतुल भोंडवे, निलेश शिंदे, विलास कुटे, विजय नाईक, धनंजय कदम, संदीप गोरे तसेच वृक्षप्रेमी व स्थानिक नागरिकांनी सकाळी घटनास्थळी उपस्थित राहून केली.

यानंतर उद्यान विभागाने अग्निशामक दलास पाचारण केले. झाड हटविण्यात आले. मात्र निष्काळजीपणे हरित सेतूचे काम करणाऱ्या संबंधितांवर महापालिका गुन्हा दाखल करणार का? असा सवाल नागरिक करत आहेत.






















Join Our Whatsapp Group