चिंचवड (Pclive7.com):- चिखली-मोशी आणि किवळे-रावेत येथील इनोव्हेटिव्ह वर्ल्ड स्कूलने मतदान जनजागृती रॅलीचे आयोजन केले. या लोकशाहीच्या उत्सवात विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि नागरिक सहभागी झाले होते. शाळेच्या विद्यार्थ्यांनी ‘मी देशाचा कार्यकर्ता मी देशाचा मतदाता’, ‘मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो’, ‘वोट द्यायला जायचे आहे. आपले कर्तव्य बजावयाचं आहे’. ‘जना मनाचा पुकार आहे, मतदान आमचा अधिकार आहे’. ‘उम्र अठरा पुरी है मत देना बहुत जरूरी है’. ‘आओ सब मिलकर गाए हम वोट देने जरूर जाए’ ‘Maharashtra we learn from you show us how to shape democracy’ असे लिहिलेले उदबोधक फलक दाखविले.
आधी मत द्या मग अल्पोपाहार घ्या’, ‘आधी मतदान करूया’, ‘मतदान हा आपला हक्क आहे’ आणि 20 नोव्हेंबरला नक्कीच मतदान करू, अशा मतदान जागृतीपर घोषणा देऊन परिसर दुमदुमून टाकला.
इनोव्हेटिव्ह वर्ल्ड स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मतदान करण्यासाठी, जागरूक नागरिक बनून आपले कर्तव्य बजावण्याची भावना समाजात रुजवली. चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर उत्सुकता दिसत होती. उद्याचे जागरूक मतदार या मुलांमध्ये दिसत होते.
लोकशाहीचा पाया मजबूत करण्यासाठी उद्याचे देशाचे भवितव्य असलेल्या विदयार्थ्यांना शिक्षकांनी लोकशाहीची मूलतत्वे याची शिकवण दिली. शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना तसेच घराजवळील नागरीकांना घरोघरी जाऊन मतदान करण्याचे आवाहन केले.
विद्यार्थ्यांच्या या नवीन उपक्रमाचे परिसरातील नागरिकांनी कौतुक केले आणि आम्ही आवर्जून मतदान करणार असा निश्चय बोलून दाखविला. मतदानाच्या निमित्ताने शाळेतील शिक्षक, कर्मचारी यांनी आपापल्या मतदान केंद्रावर उपस्थित राहून आपला मतदानाचा हक्क बजावला.
शाळेच्या संस्थापक संचालिका कमला बिश्त यांनी, आमच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना सामाजिक आणि नैतिक मूल्ये शिकविली जातात. अशा सामाजिक उपक्रमामध्ये शाळेचा नेहमीच सहभाग असतो असे सांगितले. यावेळी संचालक डॉ. संजय सिंग, डॉ. अजित थिटे आदी मान्यवर उपस्थित होते.





















Join Our Whatsapp Group