पिंपरी (Pclive7.com):- पवनाथडी जत्रेतील स्टॉल्सकरिता अर्ज केलेल्या महिला बचत गटांना स्टॉल वाटप करण्यासाठी आज (दि.१७) सकाळी अकरा वाजता बचतगटांतील महिलांसमक्ष लकी ड्रॉ काढला जाणार आहे. महापालिका मुख्यालयातील तिसऱ्या मजल्यावरील स्थायी समिती सभागृहात सकाळी ११ वाजता हा लकी ड्रॉ काढला जाणार आहे. स्टॉल मिळण्याकरिता अर्ज केलेल्या महिला बचत गटाच्या पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या समाज विकास विभागामार्फत दरवर्षी प्रमाणे महिला व बालकल्याण योजनेअंतर्गत पवनाथडी जत्रेचे आयोजन २१ ते २४ फेब्रुवारी या कालावधीत, सांगवीतील पी.डब्ल्यू.डी. मैदानात आयोजन करण्यात आले आहे.

त्याअनुषंगाने पवनाथडी जत्रेमध्ये स्टॉल लावण्याकरिता महिला बचतगटांकडून ३ ते १३ फेब्रुवारीदरम्यान महानगरपालिकेमार्फत अर्ज मागविण्यात आलेले होते. यामध्ये बचतगटातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तू विक्रीचे ४०२ स्टॉल, महाराष्ट्रीयन मराठमोळ्या शाकाहारी पदार्थांचे २९५ स्टॉल, तर मांसाहारी पदार्थाचे १७३ तसेच दिव्यांग बचतगटांना ४, सामाजिक संस्था ६, तृतीयपंथी बचतगट ३ असे एकूण ८८३ इतकी सहभागी स्टॉलची संख्या आहे. पवनाथडी जत्रेकरीता ज्या महिला बचतगटांनी अर्ज केलेला आहे, त्या सर्व बचतगटांतील महिलांनी सदर लकी ड्रॉ करीता वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

























Join Our Whatsapp Group