‘नेट ॲप’ (Net App) कडून दिल्या जाणाऱ्या पुरस्कार सोहळ्यामध्ये पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा गौरव
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या ‘प्रॉपर्टी टॅक्स इम्प्रोव्हमेंट प्रोग्राम’ (Property Tax Improvement Program) या प्रकल्पास ‘नेट ॲप’ (Net App) कडून मिळालेला इनोव्हेशन ॲवॉर्ड, इम्पॉवरिंग बिझनेसेस थ्रू डेटा (Innovation Award, Empowering Businesses Through Data) हा ‘सार्वजनिक सेवामध्ये नाविन्यता’ या श्रेणीमध्ये पुरस्कार प्राप्त झाला. सदर पुरस्कार अंधेरी, मुंबई येथील जे. डब्ल्यू. मॅरियट सहार येथे सोमवार, दि.18 फेब्रुवारी 2025 पार पडलेल्या पुरस्कार सोहळ्यामध्ये प्रसिद्ध क्रिकेटपटू जॉंटी ऱ्होड्स यांच्या हस्ते पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांस प्रदान करण्यात आला. यावेळी ‘नेट ॲप’चे कार्यकारी संचालक व उपाध्यक्ष पुनीत गुप्ता व ‘नेट ॲप’चे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि महाव्यवस्थापक क्रिश वितलदेवरा व विविध पुरस्कारार्थी बहुराष्ट्रीय कंपन्यांचे अधिकारी आदी उपस्थित होते.
‘सार्वजनिक सेवामध्ये नाविन्यता’ श्रेणीमध्ये पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेची सरशी…
‘नेट ॲप’ ही एक आघाडीची डेटा व्यवस्थापनामध्ये अग्रेसर असणारी कंपनी असून गेली अनेक वर्षे डेटाच्या माध्यमातून ज्या संस्था, खासगी कंपन्यांनी आपल्या व्यवसायामध्ये सकारात्मक बदल घडवून सुधारणा केल्या आहेत, अशा आंतरराष्ट्रीय पातळीवरील नामांकित असलेल्या ‘नेट ॲप’कडून डेटाच्या माध्यमातून सकारात्मक बदल घडविणाऱ्या संस्थांचा दरवर्षी गौरव केला जातो. यामध्ये भारतातील नामवंत बहुराष्ट्रीय कंपन्यांचा समावेश असतो. याबरोबर सार्वजनिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या संस्थांचा देखील गौरव केला जातो. भारतातील नामांकित अशा खासगी, सरकारी, सार्वजनिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या बहुराष्ट्रीय संस्था सदर पुरस्कारासाठी सहभाग नोंदवितात. माहिती तंत्रज्ञान, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा व्यवस्थापन आदी क्षेत्रामधील नामवंत ज्यूरींकडून पुरस्कारांची निवड केली जाते. यामध्ये ‘सार्वजनिक सेवामध्ये नाविन्यता’ श्रेणीतील ‘इनोव्हेशन ॲवॉर्ड’ यावर्षी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला प्राप्त झाला असून महानगरपालिकेने राबविलेल्या उपक्रमांचे कौतूक होत आहे.
पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेच्या ‘या’ पुढाकारांसाठी पुरस्कार…
1. डेटाच्या आधारे निर्णय प्रक्रियेचा वापर करुन करसंकलनामध्ये वाढ
2. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन अपूर्ण मालमत्तांच्या माहितीचे अद्ययावतीकरण
3. माहितीच्या विश्लेषणाच्या माध्यमातून मालमत्तांचा डेटाबेस व त्याबाबतच्या ट्रेंडचे विश्लेषणाचा वापर करुन लक्ष्यित कर संकलनासाठी GIS-आधारित क्लस्टरिंगची अमंलबजावणी
4. नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी सोशल मीडिया, एसएमएस, सार्वजनिक सूचना आणि तक्रार निवारण सत्रांच्या माध्यमातून जनजागृती
5. कर संकलनाचा मागोवा घेण्यासाठी, करदात्यांच्या वर्तनाचे विश्लेषण करण्यासाठी आणि डेटाचा आधार
6. बिल वितरण सुधारणेमध्ये अचूक मालमत्ता पडताळणी आणि रीअल-टाइम बिल ट्रॅकिंगसाठी मोबाइल ॲपचा वापर करुन ‘प्रकल्प सिध्दी’च्या माध्यमातून माहितीचे अद्ययावतीकरण
8. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे ऑनलाइन पेमेंटमध्ये 39% वाढी होऊन कर संकलन ₹625 कोटी (2021-22) वरून ₹977 कोटीं वर पोहोचले.
9. महिलांसाठी 400 हून अधिक रोजगाराची निर्मिती होऊन 2.27 लाख मालमत्ता रेकॉर्ड अद्ययावतीकरण करुन मालमत्ता कराचे बिल वितरण कार्यक्षमतेमध्ये सुधारणा.
10. भविष्यामध्ये ऑटोमेशनचा विस्तार करुन कृत्रिम बुध्दिमत्तेद्वारे विश्लेषण करुन नागरिकांसाठी अनुकूल डिजिटल सेवा देण्यासाठी प्रयत्नशील.
आता, महानगरपालिकेच्या सर्वच विभागामध्ये डेटा विश्लेषण पध्दतीच्या निर्णय प्रक्रियेचा वापर करण्यात येणार..!“पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने करसंकलनामध्ये वाढ होण्यासाठी व विभागाच्या प्रक्रियेमध्ये सुधारणा आणण्यासाठी ‘प्रॉपर्टी टॅक्स इम्प्रोव्हमेंट प्रोग्राम’ (Property Tax Improvement Program) या प्रकल्पाचा अवलंब केला. या माध्यमातून माहितीचे विश्लेषण करून संसाधनांचे योग्य वाटप करण्यात आले. याचबरोबर प्रभावीपणे विविध अभियान राबविण्यासाठी मदत झाली. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेला मिळालेला ‘सार्वजनिक सेवामध्ये नाविन्यता’ श्रेणीतील ‘इनोव्हेशन ॲवॉर्ड’ हा पुरस्कार ही गौरवाची बाब आहे. आता यापुढे महानगरपालिकेच्या सर्व विभागामध्ये माहितीचे विश्लेषणाचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे आता सर्व विभागामधील प्रशासकिय कामामध्ये सुलभता निर्माण होऊन नागरिकांना सेवा देण्याची प्रक्रिया गतिमान होण्यास मदत होणार आहे.”– शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका
महानगरपालिकेच्या गतिमान प्रशासनासाठी आधुनिक तंत्रज्ञान व माहिती (डेटा) विश्लेषणाची भुमिका महत्वाची..!
“पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेने आयुक्त शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनानुसार नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब करुन प्रत्येक विभागामध्ये गतिमानता आणण्यासाठी पुढाकार घेतला आहे. याचमुळे ‘नेट ॲप’ने दिलेल्या ‘इनोव्हेशन ॲवॉर्ड’ सारख्या महत्वाच्या पुरस्काराने पिंपरी चिंचवड महागनरपालिकेला गौरविण्यात आले. पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेच्या प्रत्येक विभागामध्ये यापुढे गतिमान प्रशासनासाठी आधुनिक तंत्रज्ञान व माहिती (डेटा) विश्लेषणाची भुमिका महत्वाची ठरणार असून ती राबविण्यासाठी महानगरपालिका आग्रही भुमिका घेणार आहे. नागरिकांना मिळणाऱ्या सेवांमध्ये गतिशिलता आणून त्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी येत्या काळामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाची भुमिका महत्वाची असणार आहे.”
– प्रदीप जांभळे – पाटील, अतिरिक्त आयुक्त (1), पिंपरी – चिंचवड महानगरपालिका
Tags: Empowering Businesses Through DataInnovation AwardNet AppProperty Tax Improvement Programअतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटीलइनोव्हेशन ॲवॉर्डपिंपरी चिंचवड महापालिकासार्वजनिक सेवामध्ये नाविन्यता

























Join Our Whatsapp Group