पिंपरी (Pclive7.com):- संघवी केशरी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य दिवंगत एल.बी.सुरवसे यांच्या प्रथम पुण्यतिथी दिनानिमित्त त्यांच्या माजी विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण करून अनोख्या पध्दतीने अभिवादन केले.

चिंचवड स्टेशन येथील संघवी केशरी महाविद्यालयाच्या १९८७ ते १९९२ या वर्षातील माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन ३३ वर्षांनी आपल्या महाविद्यालयीन काळातील आठवणींना उजाळाही दिला.
दुर्गादेवी टेकडी येथे झालेल्या वृक्षारोपण कार्यक्रमात माजी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी दिवंगत प्राचार्य एल.बी.सुरवसे यांचे स्मरणार्थ देशी २५ रोपट्यांचे वृक्षारोपण केले आणि या वृक्षाच्या वाढीबरोबरच आपल्या आवडत्या सुरवसे सरांची आठवण व त्यांचे प्रती प्रेम वृध्दींगत होईल अशा भावना व्यक्त केल्या.

या कार्यक्रमास प्राचार्य सुरवसे सर यांचे नातेवाईक, मुलगा, मित्र मधुकर पाटील, महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी बाळासाहेब काटे, बाबू चिंचवडे, पोर्णिमा ललवानी, रवींद्र मानकर, अशोक जगताप, संतोष शिंदे, कैलास गावडे, राजू घोलप, अविनाश कदम, मुकुंद पाटील, विष्णु पोटे, छगनजी पटेल, रेखा मराठे, उज्वला बडदे, अलका चौधरी, संस्कृती सोनवणे, स्वाती निंबाळकर, भारती दूगड(बंब), लतीश बलकवडे, विवेक धडपळे, दत्ता शिगवण, मोझेस पाटोळे, विजय चव्हाण, चंद्रकांत बारणे, विजय दरेकर, गोपी सैदाने, दत्त गवारे, प्रदीप झेंडे, दिपक कोकणे, संकेत सोनवणे, अरुण थोरात उपस्थित होते. वृक्षारोपण मोहिमेसाठी अशोक वायकर यांचे विशेष सहकार्य लाभले.

या कार्यक्रमात उच्च पदावर कामकाज करणा-या माजी विद्यार्थ्यांचा शाल, स्मृतिचिन्ह व श्रीफल देऊन सत्कार करण्यात आला. यामध्ये प्रेरणा महाविद्यालयाचे नवनियुक्त प्राचार्य नाना शिवले, सांगवी येथील बाबुरावजी घोलप महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्रा.डाॅ.वंदना पिंपळे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी नगरसदस्य जयंत बागल, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, पोलीस आयुक्त कार्यालयातील पोलीस सहाय्यक उपनिरीक्षक सुनीता चुरी, निवृत्त पोलीस उप निरीक्षक शिवाजी सस्ते, संतपीठाचे संचालक रामदास मोरे, पीएमपीएमएलचे राजू कोराळे, बालभवन संस्थेचे संचालक मधुकर इंगळे यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष निंबाळकर यांनी केले तर सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी आणि आभार राजेंद्र नाना करपे व आबा सोनवणे यांनी मानले.






















Join Our Whatsapp Group