पिंपरी (Pclive7.com):- जगदगुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या आषाढी यात्रा सोहळ्यासाठी पुणे ग्रामीण पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. या सोहळ्याच्या निमित्त मंगळवारी सकाळी देहुगाव येथे पोलीस अधिक्षक सुवेझ हक यांनी बैठक घेऊन आढावा घेतला.
यावेळी उपअधिक्षक तेजस्विनी सातपुते, डीवायएसपी जी.एस. माडगूळकर, मंदिराचे विश्वस्त, पालखी सोहळ्याचे कमिटी, देहूरोडचे निरीक्षक प्रकाश धस, सर्व प्रशासकीय विभागाचे प्रतिनिधी, परिसरातील लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
गुरुवारी (दि.५ जुलै) रोजी तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे. यासाठी सर्व यंत्रणा कामाला लागल्या आहेत. यापूर्वी पालकमंत्री गिरीष बापट, उपअधीक्षक, डीवायएसपी यांनी बैठका घेतली आहेत. मंगळवारी झालेल्या बैठकीत अद्याप पूर्ण न झालेल्या सुविधांचा आढावा घेण्यात आला.
लाखो भाविक सहभागी होणाऱ्या या पालखी सोहळ्याच्या बंदोबस्तसाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेल्या आहे. यासाठी अधिक्षक हक, उपाधिक्षक सातपुते, डीवायएसपी माडगूळकर यांच्यासह सात निरीक्षक, २२ सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक, २७० महिला पुरुष पोलिस कर्मचारी आणि १५० होमगार्ड असणार आहेत. या सोबत एसआरपीएफ, दंगा काबू नियंत्रण पथक व इतरही पथके तैनात असणार आहेत.





















Join Our Whatsapp Group