पिंपरी (Pclive7.com):- आळंदी नगरपरिषदेचे नगरसेवक बालाजी कांबळे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी कोयत्याने वार करून हत्या केली आहे. ही घटना वडमुखवाडी येथे आज दुपारी चारच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आळंदी नगरपरिषदेचे भाजपाचे नगरसेवक बालाजी कांबळे (वय ३३) वडमुखवाडी येथे आले होते. तेथून परत जाताना अज्ञात हल्लेखोरांनी कोयत्याने डोक्यात वार करून हत्या केली. त्यानंतर हल्लाखोर घटनास्थळावरून फरार झाले आहे. त्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या कांबळे यांना नागरिकांनी पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात आणले. तेव्हा डॉक्टरांच्या उपचारापुर्वीच बालाजी कांबळे यांचा मृत्यू झाला होता.





















Join Our Whatsapp Group