पिंपरी (Pclive7.com):- आळंदी नगरपरिषदेचे नगरसेवक बालाजी सुधाकर कांबळे यांची कोयत्याने वार करून भरदिवसा निर्घृण हत्या करण्यात आली. ही हत्या दोन महिन्यांपूर्वी वाढदिवसाच्या पार्टीत झालेल्या भडणातून झाली असल्याची फिर्याद कृष्णा राजकुमार घोलप याने दिघी पोलीस ठाण्यात दिली आहे.
या प्रकरणी अजय संजय मेटकरी (रा. काळेवाडी झोपडपट्टी, देहूफटा) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन महिन्यांपूर्वी मयत बालाजी कांबळे हे काळेवाडी झोपडपट्टीत आकाश जाधव आणि शुभम कांबळे याच्या वाढदिवसाला आले होते. त्यावेळी अजय मेटकरी याने दारूच्या नशेत बालाजी कांबळे यांना शिवीगाळ करून त्यांच्या बरोबर झटपट केली होती. अजय मेटकरी हा मयत बालाजी कांबळे याचा मावस भाऊ आहे. भांडणानंतर त्याने बघून घेतो अशी धमकी दिली होती. त्यानंतर त्याने अनेकवेळा धमकी दिली होती. त्यानेच भांडणाचा राग मनात धरून नगरसेवक बालाजी कांबळे यांचा खून केला. अशी फिर्याद घोलप याने दिघी पोलीस ठाण्यात दिली आहे. पुढील तपास दिघी पोलीस करीत आहेत.





















Join Our Whatsapp Group