पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे सौदागर आणि सांगवी परिसरात सोनसाखळी चोरांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. आज सकाळी (दि. २७ जून) वटपौर्णिमेच्या निमित्ताने घराबाहेर पडलेल्या चार महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसका मारून चोरून नेले आहेत.
सांगवीतील कल्पतरू सोसायटी परिसरात ३ आणि पिंपळे सौदागर मिलेनियम सोसायटी जवळ एक अशा एकूण ४ घटना घडल्या आहे. महिलांनी आज घराबाहेर निघताना विशेष काळजी घ्यावी तसेच दागिन्यांचे प्रदर्शन करू नये असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.























Join Our Whatsapp Group