पिंपरी (Pclive7.com):- मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीच्या वतीने राऊतवाडी येथे राहणारे कातकरी, समाजाच्या गोरगरीब महिलांना एक पैठणी, व एक साधी नवीन साडी व दिवाळीचा फराळ देऊन त्यांची दिवाळी गोड करण्यात आली.

शहराध्यक्ष अण्णा जोगदंड म्हणाले कि, अनेक अदृश्य दानशूर यांनी 600 नव्या साड्या आम्हाला दिल्या. आपण आपली दिवाळी आनंदात कुटुंबासोबत साजरी करत असतो. परंतु इतभर पोटाची खळगी भरण्यासाठी गावोगावी फिरून उदरनिर्वाह करणारे अशिक्षीत गोरगरिबांची दिवाळी झाल्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहून आमचीच दिवाळी झाल्याचे आम्हाला वाटले, आपल्याला समाजाचे ‘काहीतरी देणे आहे आणि ते दिले पाहिजे” या उदात्त भावनेतून सामाजिक कर्तव्य समजून आम्ही असा सामाजिक उपक्रम गेल्या 15 वर्षापासून राबविण्यात येत आहे असे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड म्हणाले.

शहराध्यक्षा मीनाताई करंजावणे म्हणाल्या की, आमच्या संस्थेने यापूर्वी देशावर, राज्यावर ज्या ज्यावेळी अस्मानी संकट येते त्यावेळी आम्ही मदत केलेली आहे. आम्ही मराठवाड्यातील पुरग्रस्त नागरिकांना हि मदत करणार आहोत असे करंजावणे म्हणाल्या.
संस्थाध्यक्ष विकास कुचेकर म्हणाले की, 15 दिवस आमच्या कार्यकर्तेनी घेतलेले परिश्रम व त्याचे चीज झाले. खऱ्या गरीब गरजवंतापर्यंत पोहोचल्याचे समाधान मिळाले. यापुढे आमची संस्था गोरगरीब वंचितांच्या पाठीशी राहील असा विश्वास कुचेकर यांनी व्यक्त केला.
स्थानिक सामाजिक कार्यकर्ते शंकर लगड व संतोष जाधव दिवाळी फराळ वाटपासाठी मोलाचे सहकार्य केले.
यावेळी संस्था अध्यक्ष विकास कुचेकर, शहराध्यक्ष आण्णा जोगदंड, महिला शहराध्यक्षा मीना करंजावणे, पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा संगिता जोगदंड, सचिन युवा मंचचे अध्यक्ष अँड सचिन काळे, संस्थेचे खेडचे अध्यक्ष शंकर नाणेकर, शहर सचिव गजानन धाराशिवकर, गुणवंत कामगार काळुराम लांडगे, मुरलीधर दळवी, वैशाली आवताडे, सामाजिक कार्यकर्ते हेमंत नेमाडे, शंकर लगड, संतोष जाधव, आयुष नेमाडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.