पिंपरी (Pclive7.com):- औद्योगिक क्रीडा संघटनेच्या ६२ व्या बुद्धिबळ स्पर्धेत अभिषेक कुमार (बजाज ऑटो, आकुर्डी) यांनी अजिंक्यपद पटकावले आणि दुसरा क्रमांक निखिल उपाध्याय (बजाज ऑटो आकुर्डी), तिसरा क्रमांक श्रीकांत मुचंडीकर (क्रोपेन्सका इंडिया प्रायव्हेट लिमिटेड), चौथा क्रमांक अद्वैत म्हात्रे (टाटा मोटर्स लिमिटेड), पाचवा क्रमांक रामचंद्रन विजय नारायणन(मॅक्सिओन व्हील्स अल्युमिनियम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड), सहावा क्रमांक रवींद्र अडकर (टीकेआयएल इंडस्ट्रीज),सातवा क्रमांक उत्कर्ष कुमार (बजाज ऑटो लिमिटेड आकुर्डी), आठवा क्रमांक अनुराग देशमुख,(आयएसी इंटरनॅशनल ऑटोमोटिव्ह इंडिया प्रायव्हेट लिमिटेड), नववा क्रमांक राहुल फड(फोर्विया), दहावा क्रमांक अभिषेक कुमार(ऑर्डिनन्स फॅक्टरी ऑर्डिनन्स फॅक्टरी देहूरोड) यांनी मिळविला. उत्कृष्ट महिला खेळाडूचे पारितोषक मधुरा कुलकर्णी हिस मिळाले.
औद्योगिक क्रीडा संघटनेच्या ६२ व्या बुद्धिबळ स्पर्धा आज दिनांक १२ ऑक्टोबर २०२५ , रविवारी रोजी फॉर्विया फोरेशिया कंपनी यांच्या कॅन्टीन हॉलमध्ये संपन्न झाली.ही स्पर्धा फॉर्विया फोरेशिया कंपनीने आयोजित केली. स्पर्धेमध्ये सँडविक एशिया, एसकेएफ, टाटा मोटर्स, थरमॅक्स बॅबकोक, टीकेआयएल,अम्युनिशन फॅक्टरी, ॲम्पियर कॉम्प्युटिंग, ऍप्लस एडिडा ग्रुप, एयूओ मोबिलिटी, बजाज ऑटो आकुर्डी, बजाज ऑटो चाकण, बजाज ऑटो चाकण-२, कोप्रेनस्का इंडिया, कमिंस इंडिया लिमिटेड, डेल्टा हायड्रोलिक,इनप्रो इंडस्ट्रीज फोरशिया इमिस्सन्स, फोर्विया इंडिया, फाइन स्पार्क, आयएसी इंटरनॅशनल ऑटोमोटिव्ह, इंडप्रो, जेसीबी इंडिया लिमिटेड, महिंद्रा अँड महिंद्रा, मॅक्सिओन व्हील्स ॲल्युमिनियम, माझगाव डॉक लिमिटेड,ऑर्डिनन्स फॅक्टरी देहूरोड, प्राज इंडस्ट्रीज एकूण ३० कंपन्यांच्या १४० खेळाडूंनी या स्पर्धेत भाग घेतला. यामध्ये पुरुष आणि महिला खेळाडूंचाही समावेश आहे. यावर्षी या स्पर्धेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.
या स्पर्धेचे पारितोषिक वितरण किशोर जाधव (एफसीएम डायरेक्टर, इंडिया बोर्ड मेंबर फोर्विया फोरशिया), जितेंद्र निखळ (ऍडमिन हेड फोर्विया फोरशिया), औद्योगिक क्रीडा संघटनेचे उपाध्यक्ष नरेंद्र कदम, सहखजिनदार विजय हिंगे, स्पर्धा प्रमुख हरी देशपांडे, प्रीती कुलकर्णी (एडमिन मॅनेजर) यांच्या हस्ते झाले.
याप्रसंगी बोलताना किशोर जाधव म्हणाले की, बुद्धिबळाचा खेळ मानसिक व्यायाम घडवितो आणि याद्वारे आपल्याला विविध प्रश्नांची उकल करण्यास मदत करतो. उपाध्यक्ष नरेंद्र कदम म्हणाले की, खेळाडूंचा मिळाला मिळालेला प्रचंड प्रतिसाद पाहून पुढील वर्षीपासून शिस्तबद्ध संघासाठी दोन व वैयक्तिक दोन बक्षीस वाढवण्यात येतील. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वृषाली मगर तर मागील वर्षाच्या प्रगतीचा आढावा व आभारप्रदर्शन औद्योगिक क्रीडा संघटनेचे खजिनदार प्रदीप वाघ यांनी केले. या स्पर्धेचे संपूर्ण युट्युब प्रक्षेपण मंदार कुलकर्णी यांनी केले.
याप्रसंगी जितेंद्र निखळ (ॲडमिन हेड फॉरविया), फॉरविया स्पोर्ट्स कमिटीचे दत्ता पाटील, अनिकेत आवटे, प्रणित गवंडगावे, सागर पटेकर, अभिजीत शिंदे, अजय वाल्हेकर, फ्रान्सिस मिनीजेस, प्रशांत मल्ला (ऍडमिनिस्ट्रेशन, फोर्विया), कल्याणी खडके, आकाश मस्के, बजाज ऑटो आकुर्डीचे अतुल काळोखे (एचआर मॅनेजर), दुष्यंत गायकवाड (सँडविक इंडिया स्पोर्ट्स कमिटी), संतोष शिंदे(एसकेएफ स्पोर्ट्स कमिटी), सचिन कांबळे (जेसीबी स्पोर्ट्स कमिटी), श्रीनिवास मोरे, दिनेश भुजबळ (महिंद्रा अँड महिंद्रा स्पोर्ट्स कमिटी) व औद्योगिक क्रीडा संघटनेचे उपाध्यक्ष नरेंद्र कदम,स्पर्धाप्रमुख हरी देशपांडे, खजिनदार प्रदीप वाघ, सहखजिनदार विजय हिंगे, मंदार कुलकर्णी उपस्थित होते.
या स्पर्धेचे आयोजन टॅक्टिकल मुव्हज अकॅडमीचे आदेश इंगळे, अनुप पांडे, मयूर शिंदे, चंद्रकांत चौधरी यांनी केले.यावेळी स्पर्धेचे कामकाजसाठी इंटरनॅशनल ऑर्बिटर शार्दुल तपासे, सीनियर नॅशनल ऑर्बिटर अपर्णा शिंदे यांचे साह्य लाभलेले आहे.
स्पर्धेचे ,६,७,८ व्या फेरीचे निकाल खालील प्रमाणे आहेत.
६ वी फेरी
१) जगदीश मलेला(टाटा मोटर्स) बरोबरी विरुद्ध श्रीकांत मुचंडीकर(कोपरेन्सका)(१/२- १/२) एकूण=(५ १/२- ५ १/२)
२) रामचंद्रन विजय नारायण(मॅक्सोन व्हील्स ॲल्युमिनियम) विजयी विरुद्ध रवींद्र अडकर (टीकेआयएल)(१-०), एकूण=(५ १/२-५)
३) देशमुख अनुराग(आयएसी)पराभूत विरुद्ध अभिषेक कुमार(ओएफडीआर)(०-१), एकूण=(४-५ १/२)
४) उत्कर्ष कुमार (बजाज ऑटो आकुर्डी) विजयी विरुद्ध मानवेल दास (अमुनेशन फॅक्टरी) (१-०)एकूण=(५- ४)
५) निखिल उपाध्याय (बजाज ऑटो आकुर्डी)फॅक्टरी विजयी विरुद्ध राहुल फड(फोर्विया)(१-०), एकूण=(५-४).
सहाव्या फेरी अखेर जगदीश मलेला,श्रीकांत मुचंडीकर,रामचंद्रन विजय नारायण,अभिषेक कुमार ५ १/२ गुण मिळवून आघाडीवर होते. तर रवींद्र आडकर,उत्कर्ष कुमार,निखिल उपाध्याय,अनिल बालगुडे,विनायक बेलेकर,संकेत घाटणेकर,अजय म्हात्रे ५ गुण मिळवून दुसऱ्या क्रमांकावर होते.
७ वी फेरी
१) श्रीकांत मुचंडीकर(क्रोपेन्सका) विजयी विरुद्ध रामचंद्र विजय नारायण(मॅक्सओन व्हील्स)(१-०), एकूण=(६ १/२-५ १/२)
२) अभिषेक कुमार(बजाज ऑटो आकुर्डी) विजयी विरुद्ध जगदीश मलेला(टाटा मोटर्स)(१-०),एकूण=(६ १/२-५ १/२.)
३) निखिल उपाध्याय(बजाज ऑटो आकुर्डी) विजयी विरुद्ध आकाश जाधव(कमिन्स इंडिया)(१-०), एकूण=६-५
४) रवींद्र अडकर(टीकेआयएल) बरोबरी विरुद्ध उत्कर्ष कुमार(बजाज ऑटो आकुर्डी)(१/२-१/२), एकूण=(५ १/२- ५ १/२)
५) अनिल बालगुडे(टाटा मोटर्स) विजयी विरुद्ध विनायक बेलेकर(टीकेआयएल)(१-०), एकूण=(६-५)
६) अद्वैत म्हात्रे(टाटा मोटर्स) विजय विरुद्ध संकेत घाटणेकर(कमिन्स इंडिया) (१-०), एकूण=(६-५).
सातव्या फेरी अखेर श्रीकांत मुचंडीकर,अभिषेक कुमार ६ १/२ तर उपाध्यय निखिल, अनिल बालगुडे, अद्वैत म्हात्रे ६ गुण घेऊन दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
८ वी फेरी
१) निखिल उपाध्याय (बजाज ऑटो आकुर्डी विजयी विरुद्ध अनिल बालगुडे (टाटा मोटर्स) (१-०) एकूण=(७-६)
२) रामचंद्रन विजय नारायण (मॅक्सओन व्हील्स) विजयी विरुद्ध संदीप भामरे(बजाज ऑटो आकुर्डी) (१-०) एकूण=(६ १/२,५ १/२)
३) कृष्णकुमार जोरूले (महिंद्रा अँड महिंद्रा) पराभूत विरुद्ध रवींद्र आडकर(टीकेआयएल) (०-१) एकूण=(५ १/२-६ १/२)
४) उत्कर्ष कुमार (बजाज ऑटो आकुर्डी) विजयविरुद्ध आकाश जाधव(कमिन्स इंडिया) (१-०) एकूण==(६ १/२,५)
५) अभिषेक कुमार (बजाज ऑटो आकुर्डी) बरोबरी मुचंडीकर श्रीकांत(क्रोपेन्सका)(१/२-१/२), एकूण= (७-७)
स्पर्धेचे निकाल टॅक्टिकल मुव्हज चेस अकॅडमीचे आदेश इंगळे यांनी जाहीर केले.
१)प्रथम क्रमांक अभिषेक कुमार (बजाज ऑटो आकुर्डी) २)निखिल उपाध्याय (बजाज ऑटो आकुर्डी) ३)श्रीकांत मुचंडीकर (क्रोपेन्सका इंडिया प्रायव्हेट लिमिटेड) ४) अद्वैत म्हात्रे (टाटा मोटर्स लिमिटेड) ५) रामचंद्रन विजय नारायणन (मॅक्सिओन व्हील्स अल्युमिनियम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड) ६) रवींद्र अडकर (टीकेआयएल इंडस्ट्रीज) ७) उत्कर्ष कुमार (बजाज ऑटो लिमिटेड आकुर्डी) ८) अनुराग देशमुख (आयएसी इंटरनॅशनल ऑटोमोटिव्ह इंडिया प्रायव्हेट लिमिटेड) ९) राहुल फड (फोर्विया)१०) अभिषेक कुमार (ऑर्डिनन्स फॅक्टरी ऑर्डिनन्स फॅक्टरी देहूरोड)