पिंपरी (Pclive7.com):- श्री साई चौक मित्र मंडळ आणि विलासभाऊ मडिगेरी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने इंद्रायणीनगर, भोसरी येथील श्री वैष्णोमाता मंदिर प्रांगणात दिपावलीनिमित्त किल्ले बनवा स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत ३१० इतक्या लहानग्यांनी सहभागी होत एकूण ६२ वेग वेगळे किल्ल्याच्या प्रत्यक्ष दुर्ग प्रतिकृती बनवल्या. तर, विजेत्या स्पर्धकांचा बक्षिस वितरण समारंभ ही नुकताच पार पडला. तसेच पुढील ७ दिवस प्रदर्शन ठेवला होता.

दुर्ग बनवा स्पर्धा १७ ते १९ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत पार पडली. स्पर्धेचे यंदाचे हे पाचवे वर्षे आहे. स्पर्धेत ५ ते १४ या वयोगटातील मुले सहभागी झाले होते. किल्ला बनविण्यासाठी माती, विट, दगड,पाणी, बारदान, पांढरी व हिरवी रांगोळी, कोळसा पूड आदी सर्व साहित्य उपलब्ध करून देण्यात आले. स्पर्धेतील पहिल्या पाच किल्ल्याच्या विजेत्या मुलांना रोख रक्कम बक्षीस देण्यात आले.
१) प्रथम किल्ला राजगड ११,१११/-
२) द्वितीय किल्ला प्रतापगड ९,९९९/-
३) तृतीय किल्ला शिरगाव ७,७७७/-
४) चतुर्थ किल्ला लींगणा ५,५५५/-
५) पंचम किल्ला अंकाई ३,३३३/-

तसेच आणखी किल्ल्याच्या विजेत्या परीक्षकांच्या सूचनेनुसार उत्तेजनार्थ म्हणून प्रबळगड , राजमाची गड , केळवे गड, जंजिरा असे पाच किल्याना रोख बक्षीस तसेच प्रत्येकाला ट्रॉफी व टिफीन बॉक्स देऊन गौरविण्यात आले. तर, सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ रविवार दिनांक १९ ऑक्टोबर रोजी विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे, आरएसएस चे प्रांत मंडळ सदस्य विलास लांडगे, टाटा मोटर्स युनियनचे माजी अध्यक्ष तथा कामगार नेते सचिन (भैय्या) लांडगे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विलास मडिगेरी, चंद्रकांत देशमुख, नेताजी घारे असे अनेक मान्यवर यांच्या उपस्थितीत पार पडला.

आमदार अमित गोरखे यांनी विलास मडिगेरी वर्षभर राबविल्या जाणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमातून समाजाला दिशा देण्याचे काम करत असल्याचे नमूद केले. महाराष्ट्र हि किल्ल्यांची भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज व त्यांच्या सरदारांच्या शौर्याच्या कथा याच गडकिल्ल्यांवर घडल्या. याच शौर्याची ओळख मुलांना व्हावी व महाराजांचे गडकिल्ले हे पुढच्या पिढीपर्यंत पोहचवण्यासाठी ही किल्ले बनवा स्पर्धा निश्चित महत्वपूर्ण ठरत आहे.
विलास मडिगेरी म्हणाले की, लहानपणीच आपल्या मुलांवर इतिहासाचा संस्कार झाला पाहिजे. या उद्देशाने आम्ही या ठिकाणी मागील चार वर्षांपासून ही स्पर्धा घेत असून यावर्षी हे पाचवे वर्ष आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील त्याच उत्साहाने असंख्य मावळे यात सहभागी झाले असून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. तसेच या सहभागी सर्व मुलांना शिवनेरी किल्ला भेटीस घेवून जाणार आहे.
या स्पर्धेचे परीक्षक म्हणून अनिल दुधाने, संतोष चंदने, किरणकुमार करांडे यांनी काम पाहिले. संपूर्ण स्पर्धेचे नियोजन व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ओंकार हलगौडा, संजय जगताप, संदेश शिंदे, नुमेश कुदळे, ऋषभ जमदाडे, गुंजन दीक्षित, लोकेश चौधरी, रविराज भेलसईकर, किशोर अभंग, गिरीश काळे, अनिकेत सोनकुळ राज पवार,देवराज पांचाळ कृष्णा दीक्षित व चंदू स्वामी यांनी परिश्रम घेतले. बक्षीस वितरण समारंभाचे निवेदन धनंजय जाधव यांनी केले. हनुमंत पवार यांनी आभार मानले.
























Join Our Whatsapp Group