पिंपरी (Pclive7.com):- अखिल भारतीय वारकरी संप्रदायचे कोषाध्यक्ष शेखर कुटे व नगरसेविका निर्मला संजय कुटे यांच्या वतीने पंढरपूर देवस्थान ट्रस्टच्या सहअध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल गहिनीनाथ महाराज औसेकर यांचा सत्कार पिंपळे सौदागर येथील विठ्ठल रूख्मणी मंदिर मध्ये घेण्यात आला.
याप्रसंगी माजी आमदार विलास लांडे, नगरसेवक शत्रुघ्न काटे, बबनराव झिंजुर्डे, जयनाथ काटे, संजय कुटे, वल्मिक कुटे, रंगनाथ फुगे, बाबासाहेब तापकीर विजुआण्णा जगताप, संजय भिसे, संदेश काटे, जेष्ठ किर्तनकार श्रीगुरू चैतन्य महाराज देगलुरकर, वैष्णव भुषण हभप प्रमोद महाराज जगताप, महामंडलेश्वर लहवितकर महाराज, हभप पुरूषोत्तम पाटील, हभप योगीराज गोसावी, संस्थानचे विश्वस्त जंजाळ महाराज, हभप चंद्रकांत वांजळे, हभप संतोष पायगुडे, मृदंगमणी गंभीर महाराज, दातार गुरूजी, गायनाचार्य गरड गुरूजी, भगुरे गुरूजी, हभप येवले, हभप बुचूडे, इंगोले महाराज आदी किर्तनकार, गायक व पिंपळे सौदागर व परिसरातील वारकरी संप्रदायातील मान्यवर उपस्थित होते. तसेच या प्रसंगी सर्व भाविक भक्तांसाठी सस्नेह भोजनाचे आयोजन आयोजकातर्फे करण्यात आले होते.





















Join Our Whatsapp Group