पिंपरी (Pclive7.com):- कपाळी केशरी गंध आणि मनात विठुरायाच्या भेटीचा छंद बाळगलेल्या लाखो वैष्णवांच्या जथ्थ्यात संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याने आज सायंकाळी चारच्या सुमारास देहूतून पंढरपुरच्या दिशेने प्रस्थान ठेवले. पालखी प्रस्थान होताच वरुणराजानेही हजेरी लावल्याने वारकरी सुखावला. दुबार पेरणीचे संकट येवू देवू नकोस, असे साकडे त्याने लाडक्या विठुरायाला घातले.
प्रस्थान सोहळ्यासाठी संपूर्ण देहू नगरी सकाळपासून भक्तिचैतन्यात दंग झाली होती. प्रस्थानापूर्वी शिळा मंदिरात गुरुवारी पहाटे साडेचार वाजता महापूजा करण्यात आली. सकाळी नऊ वाजता पालखी सोहळा सप्ताह काल्याचे कीर्तन झाले. दुपारी अडीच वाजता पालखी सोहळ्याच्या प्रस्थान कार्यक्रमाला सुरुवात झाली. प्रस्थान झाल्यावर मंदिर प्रदक्षिणा केल्यानंतर फुलांनी सजविलेली तुकाराम महाराजांची पालखी देऊळवाड्यातून बाहेर पडली.
यावेळी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट सपत्नीक, माजी मंत्री बबनराव पाचपुते, खासदार श्रीरंग बारणे, आमदार बाळा भेगडे आदी मान्यवर उपस्थित होते.





















Join Our Whatsapp Group