पिंपरी (Pclive7.com):- संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी आलेल्या एका खासगी वाहनचा अपघात होऊन १४ महिला वारकरी जखमी झाल्या. जखमी वारकऱ्यांवर देहूगावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. ही घटना आज (शुक्रवार) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, भंडारा डोंगराच्या पायथ्याला एका खासगी वाहनाचा अपघात झाला. या अपघातात १४ वारकरी महिला जखमी झाल्या. त्यातील सहा महिलांवर देहूगाव मधील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचार करण्यात आले. तर अन्य आठ महिलांना पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल करण्यात आले. दाखल करण्यात आलेल्या महिलांपैकी एका महिलेचा खांदा निखळला आहे. तर एका महिलेच्या नाकाला गंभीर जखम झाली आहे. उर्वरित सहा महिलांवर प्राथमिक उपचार करण्यात आले.
दोनच दिवसांपूर्वीच दोन महिला वारकऱ्यांचा मोशी येथे अपघातात मृत्यू झाला होता.
























Join Our Whatsapp Group