पिंपरी (Pclive7.com):- मुखी हरिनामाचा गजर करीत, टाळ मृदुंगाच्या गजरात जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे पिंपरी चिंचवड शहरात आगमन झाले. या सोहळ्यात प्रत्येकजण सहभागी होत होता, दरवर्षी प्रमाणे भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांनी पालखीचे सारथ्य केले.
मी या मातीत जन्मलो याचा मला सार्थ अभिमान आहे. माझ्या वाडवडिलांपासून संप्रदायिक परंपरा चालत आली आहे. महाराष्ट्राच्या या गौरवशाली परंपरेचा मला सार्थ अभिमान आहे. पिंपरी चिंचवडकरांना प्रत्येक अडीअडचणीतून दूर करावे, येथील जनतेचे प्रश्न सोडवण्याची शक्ती मला मिळो असे साकडे यानिमित्त पांडूरंगा चरणी घातले असल्याचे आमदार महेश लांडगे म्हणाले.
विठ्ठलाच्या ओढीने पंढरपुरच्या दिशेने निघालेला संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा देहूकरांचा निरोप घेऊन आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मजल-दरमजल करत दाखल झाला. यावेळी निगडीतील भक्ती-शक्ती चौकापूर्वी काही मैलापासून आमदार महेश लांडगे यांना तुकोबांच्या पालखीचे सारथ्य केले.
























Join Our Whatsapp Group