
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड खंडणी विरोधी पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे काळेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत मोठी कारवाई करत भारतीय हत्यार अधिनियम अंतर्गत एका १९ वर्षीय तरुणाला अटक केली आहे.

खंडणी विरोधी पथकाने सापळा रचून आरोपी रोहन बाबासाहेब गायकवाड याला ताब्यात घेतलं असून त्याच्यावर काळेवाडी पोलीस स्टेशन येथे भारतीय हत्यार अधिनियम कलम ४(२५) आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१)(३) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी रोहन गायकवाड याचा कोणताही पूर्व इतिहास नसल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले आहे. पुढील कायदेशीर कारवाईसाठी आरोपीस काळेवाडी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.


























Join Our Whatsapp Group