
राजेंद्र तरस यांच्या वाढदिवसानिमित्त किवळे येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन
पिंपरी (Pclive7.com):- शिवसेना युवा नेते राजेंद्र तरस यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार दि.२९ रोजी प्रभाग क्र.१६ किवळे, रावेत, मामुर्डी, साईनगर, विकास नगर, गुरुद्वारा, वाल्हेकरवाडी परिसरातील महिलांसाठी न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे प्रथम क्रमांकाच्या विजेत्या महिलेला ‘फोर व्हीलर कार’ बक्षीस स्वरूपात देण्यात येणार आहे.

हा कार्यक्रम शनिवार, २९ नोव्हेंबर २०२५ रोजी संध्याकाळी ६ वाजता मुकाई चौक, किवळे गुप्ता मैदान येथे पार पडणार आहे. युवानेते राजेंद्र बाळासाहेब तरस यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम राबवण्यात आला असून ऐश्वर्या राजेंद्र तरस सोशल फाउंडेशनच्या वतीने या स्त्री सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमात महिला स्पर्धकांसाठी आकर्षक बक्षीस ठेवण्यात आले आहेत. प्रथम क्रमांकाच्या विजेत्या महिलेला फोर व्हीलर कार, द्वितीय विजेत्या महिलेस ऍक्टिवा दुचाकी बक्षीस स्वरूपात देण्यात येणार आहे. तसेच LED TV, फ्रिज, वॉशिंग मशीन, शिलाई मशीन कुलर ओटीजी इलेक्ट्रिक किटली डिनर सेट अशा अनेक घरगुती वस्तूंचा समावेश आहे. यासह महिलांना २० लकी ड्रॉ बक्षिसे देण्यात येणार आहे.

























Join Our Whatsapp Group