
निलेशदादा नेवाळे सोशल फाउंडेशन आणि शिवपुर्णा प्रतिष्ठानच्या वतीने स्पर्धेचे आयोजन
भोसरी (Pclive7.com):- हिंदुभूषण क्रीडा महोत्सव 2025 अंतर्गत आयोजित पूर्णानगर प्रीमियर लीग 2025 या भव्य क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन युवा नेते निलेश नेवाळे यांच्या हस्ते करण्यात आले आहे. भोसरी विधानसभेचे क्रीडाप्रेमी आमदार पै. महेशदादा लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम राबविण्यात येत असून, श्री. निलेशदादा नेवाळे सोशल फाउंडेशन आणि शिवपूर्णा प्रतिष्ठान, पूर्णानगर यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

या उद्घाटन प्रसंगी माजी नगरसेवक अजय सायकर, पोपट हजारे, संतोष ठाकूर, अरुण पाडुळे, सारिका पवार, अतुल सोंडेकर, अजय साने, मारुती जाधव, हिंदुराव पाटील, स्वप्निल शेंडगे तसेच प्रभाग ११ मधील भाजपाचे पदाधिकारी, शिवपूर्णा प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी तसेच परिसरातील सोसायटीधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ही स्पर्धा बुधवार दि.२६ नोव्हेंबर ते रविवार, दि.३० नोव्हेंबर या कालावधीत पार पडणार असून दररोज सायंकाळी ५ ते रात्री ११ या वेळेत रोमांचक सामने खेळवले जाणार आहेत. ही स्पर्धा पंडीत दीनदयाळ उपाध्याय क्रीडांगण, शनि मंदिर, पूर्णा नगर या ठिकाणी संपन्न होणार आहे.

या स्पर्धेमुळे क्रीडाप्रेमींमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. सामाजिक कार्यकर्ते निलेश नेवाळे यांनी या स्पर्धेमुळे परिसरातील तरुणाईला एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. पूर्णा नगर प्रीमियर लीग 2025 मुळे क्रीडा संस्कृती वृद्धिंगत होण्यास मदत मिळणार आहे.

























Join Our Whatsapp Group