
हजारो भाविकांची वाकड–ताथवडे- पुनावळे परिसरातून गर्दी
वाकड (Pclive7.com):- वाकड येथे राम हनुमंत वाकडकर आयोजित तीन दिवसीय श्रीकृष्णलीला (मायरा कथा) सोहळ्याचा काल भक्तिमय वातावरणात यशस्वी समारोप झाला. तीन दिवसांपासून सुरू असलेल्या या भव्य सोहळ्याला वाकड–ताथवडे- पुनावळे परिसरातून हजारो भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. परिसरात अखंड नामस्मरण, अध्यात्मिक वातावरण आणि भक्तिरसाने न्हाऊन निघालेली उपस्थिती पाहता संपूर्ण वातावरण पवित्रतेने दुमदुमले होते.

पहिल्या दिवशी झालेल्या उद्घाटनापासूनच भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. जया किशोरी यांच्या अमृतमय आणि हृदयस्पर्शी निरूपणाने तीनही दिवस भाविक मंत्रमुग्ध झाले. सोहळ्यादरम्यान महिलावर्ग, तरुण, तसेच कुटुंबांसह वयोवृद्धांची उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली. परिसरातील विविध सामाजिक मंडळी आणि मान्यवरांनीही उपस्थित राहून सोहळ्यास अधिक रंगत आणली.

मुख्य आयोजक राम हनुमंत वाकडकर यांनी सांगितले की, “वाकड–ताथवडे- पुनावळे परिसरात आजवर केलेल्या सामाजिक आणि सेवाभावी कामाची पावती नागरिकांनी दिलेल्या या प्रचंड प्रतिसादातून दिसून आली. तीन दिवसांच्या या सोहळ्यात भाविकांनी दाखवलेला सहभाग अविस्मरणीय आहे.”
तीन दिवस चाललेल्या या कथा सोहळ्याने वाकड–ताथवडे- पुनावळे परिसराच्या अध्यात्मिक संस्कृतीत एक विशेष अध्याय जोडला असून, भाविकांच्या मोठ्या गर्दीमुळे हा कार्यक्रम वर्षानुवर्षे स्मरणात राहील, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.

यावेळी खासदार- श्रीरंग (आप्पा)बारणे, आमदार शंकरभाऊ जगताप, आमदार अमितजी गोरखे, आमदार उमाताई खापरे, आमदार श्रीकांत भारती, आमदार उमाताई खापरे, आमदार श्रीकांत भारती, खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या मातोश्री, रुक्मीणी मोहोळ, माजी आमदार – अश्विनी ताई जगताप, भा.ज.पा. शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, जेष्ठ नेते नाना काटे, नगरसेवक विनायक दादा गायकवाड, नगरसेवक भाऊसाहेब भोईर, नगरसेवक संदीप कस्पटे, नगरसेविका आरतीताई चोंधे, नगरसेविका सुनिता तापकीर, नगरसेवक चंद्रकांत नखाते, नगरसेविका सविता खुळे, नगरसेवक शेखर चिंचवडे, नगरसेवक प्रशांत शितोळे, नगरसेवक विलास मेडगिरी, माजी महापौर नितिन आप्पा काळजे, नगरसेविका ममता गायकवाड, नगरसेविका अश्विनी वाघमारे, ह.भ.प लहु महाराज जमदाडे ह.भ.प शेखर जांभुळकर, ह.भ.प. महादेव महाराज भुजबळ, A.C.P. सुनिल कुऱ्हाडे साहेब, हिंजवडी पोलिस वरिष्ठ पोलीस निरिक्षक बालाजी पांढरे साहेब, उपमहाराष्ट्र केसरी, विशाल आप्पा कलाटे, युवा नेते संदीप पवार, युवा नेते चेतन भुजबळ, गणेश कस्पटे, संतोष पवार, पवार, विजय दर्शिले राजाभाऊ भुजबळ, मोहनदादा भुमकर, भारती विनोदे, रणजित कलाटे, विशाल वाकडकर, धनाजी मामा विनोदे, कुणाल वाकडकर, विक्रम वाघमारे, अंकुश कलाटे, सोमनाथ कलाटे, प्रकाश जमदाडे, अंकुश भुजबळ, तेजस्वीनी ढोमसे, विक्रम विनोदे , अमर भूमकर, योगेश बाबर, रुपेश कलाटे, संजय भुजबळ, विश्वजित बारणे, अमित दर्शिले, विनोद कलाटे, तुषार देवकर, सागर भुमकर आदी मान्यवर उपस्थित होते.

























Join Our Whatsapp Group