पिंपरी (Pclive7.com):- पावसामुळे पिंपळे सौदागर प्रभागातील बऱ्याच रस्त्यावर खड्डे पडले होते. गणेशोत्सवापूर्वी प्रभागातील सर्व खड्डे बुजविण्यात यावेत अशा सुचना भाजप नगरसेविका निर्मला कुटे आणि नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी महापालिका प्रशासनाला दिल्या आहेत.
नगरसेविका निर्मला कुटे यांनी प्रसिध्दीपत्रकातून याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, यंदाच्या वर्षी पाऊस मोठ्या प्रमाणात झाला आहेत. त्यामुळे पिंपळे सौदागर प्रभागातील बऱ्याच अंतर्गत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. दरम्यान गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळेच नागरिकांना नाहक त्रास होऊ नये यासाठी महापालिका प्रशासनाला तातडीने खड्डे बुजविण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार द्वारका सन क्रिस्ट सोसायटी ते कापसे लॉन्स येथील १२ मीटर रस्त्यावरील खड्डे बीबीएम पद्धतीने बुजविण्याच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे.