पुणे (Pclive7.com):- गणेशोत्सवाचे जनक कोण यावरुन मागील वर्षी पुणे महापालिका,राज्य सरकार आणि श्रीमंत भाऊ रंगारी ट्रस्ट यांच्यात वाद सुरु होता. सार्वजनिक गणेशोत्सवाला भाऊसाहेब रंगारी यांनी सुरुवात केली असा दावा भाऊसाहेब रंगारी मंडळाकडून केला जातोय. त्याबाबतचे पुरावे ही मंडळाने सादर केले होते. त्यांनतर सातत्याने याबाबत चर्चा सुरू आहे. नागरिकांना या संदर्भातील माहिती व्हावी या उद्देशाने या चित्रपटाची निर्मिती केली जाणार आहे. श्रीमंत भाऊ रंगारी ट्रस्टच्यावतीने श्रीमंत भाऊसाहेब रंगारी या चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार आहे. अशी माहिती ट्रस्टचे सचिव सुरज रेणुसे, दिग्दर्शक गणेश कोळपकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मागील वर्षी गणेशोत्सवाचे जनक लोकमान्य टिळक किंवा श्रीमंत भाऊसाहेब रंगारी हा वाद सुरु होता. पण ज्या भाऊसाहेब रंगारी यांनी सार्वजनिक गणेशोत्सव हा जनमाणसात जावा यासाठी स्वतःची मालमत्ता विकली आणि हा उत्सव सुरु केला. अशा भाऊसाहेबाचा इतिहास जनते पुढे येत नव्हता. याशिवाय त्यांनी भुमिगत राहुन ब्रिटिशांशी दोन हात केले अशा श्रीमंत भाऊसाहेब रंगारी याचा इतिहास लोकांसमोर यावा या उद्देशाने या चित्रपटाची निर्मिती पुढील गणेशोत्सवा दरम्यान होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन गणेश कोळपकर, कुमार गावडा हे करणार आहेत.






















Join Our Whatsapp Group