पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे सौदागर येथील उन्नती सोशल फाऊंडेशनच्या वतीने दिवाळीनिमित्त ‘स्वरामृत दिवाळी पहाट’चे आयोजन करण्यात आले होते. हभप पुरुषोत्तम महाराज पाटील, उद्योजक विजय जगताप,नगरसेवक शत्रुघन काटे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी ज्ञानेश्वर मेश्राम, भाग्यश्री देशपांडे, निवृत्ती धाभेकर या गायकांनी आपल्या अभंगवाणीने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. यानिमिताने स्नेहवन अनाथ आश्रमातील दहा मुलांच्या शिक्षणाच्या खर्चाचा धनादेश देण्यात आला.

यावेळी नगरसेविका निर्मला कुटे, उन्नती सोशल फौंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे, संस्थापक संजय भिसे, उद्योजक विजय भिसे, वसंत काटे,राजू भिसे, जगन्नाथ काटे, शंकर चौंधे, जयनाथ काटे, हभप शेखर कुटे, श्याम कुंजीर, रामप्रकाश वासन, अशोक काटे, विलास काटे, आनंदा काटे, रमेश काटे, विकास काटे, बछराम शर्मा, राजेंद्र जयस्वाल, राजेंद्र पाटील, विवेक तितमारे, सुनील कुंजीर, रोहिदास गवारे, अतुल पाटील यांच्यासह परिसरातील राजकीय सामाजिक अध्यात्मिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर व ग्रामस्त उपस्थित होते.
याप्रसंगी भाग्यश्री देशपांडे यांनी राम का गुणगान करिये, सारेगमपा फेम ज्ञानेश्वर मेश्राम यांनी रामकृष्ण हरी गाजर, विठू माउली तू माउली जगाची, देवा तुझ्या नावाचे याड लागलं या भावगीताने उपस्थित मंत्रमुग्ध झाले. तर राधाकृष्ण गारद यांच्या सुख सागर आपण व्हावे,श्री ज्ञानदेवा चरणी, अब तुम कब सुमरोगे राम यांच्या या गीतांना उपस्थितांनी दाद दिली. यांना संतोष साळवी, तुषार केळकर, गंभीर महाराज अवचार, सिद्धीविनायक पैठणकर यांची वादनाची उत्तम साथ दिली. सामाजिक बांधिलकी म्हणून ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली अशा दहा अनाथ मुलांचा शिक्षणाचा खर्च उचलण्याची जवाबदारी उन्नती सोशल फाउंडेशनच्या वतीने घेण्यात आला. तर येथील रोज आयकॉन सोसायटी येथील पाच अनाथ मुलांच्या शिक्षणाचा खर्च करण्याची जबाबदारी घेतली. विजय बोत्रे पाटील यांनी सूत्रसंचालन केले.
























Join Our Whatsapp Group