पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवडमधून भरदिवसा एका १२ वर्षीय मुलीचे अपहरण झाल्याच्या घटनेने गुरूवारी एकच खळबळ उडाली होती. चिंचवडमधील रेल्वेस्टेशन समोरील क्वीन्सटाऊन सोसायटी येथे राहणाऱ्या मुलीचे शाळेतून येत असताना सोसायटीसमोरून अपहरण करण्यात आले होते. दुपारी ४ वाजता ही घटना घडली होती. त्यानंतर पोलीसांनी तपासाची सुरू केला आणि अवघ्या ९ तासात या चिमुकलीची अपहरणकर्त्यांच्या तावडीतून हिंजवडी येथून सुखरूप सुटका केली.
माही अवध जैन (वय १२ रा. क्वीन्सटाऊन, चिंचवड) असे या अपहपण झालेल्या मुलीचं नाव आहे. याप्रकरणी २ जणांना पोलीसांनी अटक केली आहे.
























Join Our Whatsapp Group