पिंपरी (Pclive7.com):- रहाटणी पिंपळे सौदागर येथील औंध – रावेत बीआरटीएस या मार्गावर जगताप डेअरी चौक येथे पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण वतीने नव्याने विकसित होत असलेल्या उड्डाण पुलाला “धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज” उड्डाण पूल असे नाव देण्यात यावे अशी मागणी नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे व नगरसेविका शितल काटे यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीशकुमार खडके व ड क्षेत्रिय कार्यालय प्रशासन अधिकारी बहुरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
धर्मवीर संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीला ऐतिहासिक वारसा आहे. त्यांचे जीवन चरित्र आजच्या पिढीला आजही प्रेरणादायी आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्यबद्दल व त्यांच्या बलिदानाबद्दल महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशाच्या प्रत्येक राज्यातील व्यक्तीला माहिती असून या बलिदानाचे स्मरण व्हावे. म्हणून औंध रावेत बीआरटीएस या मार्गावर रहाटणी पिंपळे सौदागर येथील जगताप डेअरी चौकातील नव्याने विकसित होत असलेल्या उड्डाण पुलाला “धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज” उड्डाणपूल असे नाव देण्यात यावे अशी मागणी नगरसेवक नाना काटे व शितल काटे यांनी केली आहे.
























Join Our Whatsapp Group