पिंपरी (Pclive7.com):- हवामान खात्याने पुणे जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जाहीर केल्यानंतर आज दुपारनंतर शहरात अवकाळी पावसाने हजेरी लावली. मात्र या पावसामुळे प्रशासनाच्या तयारीचा अभाव पुन्हा एकदा समोर आला. पावसाळ्यापूर्वी नालेसफाई न झाल्याने शहरातील अनेक भागांत पाणी साचल्याचे चित्र दिसून आले.

विशेषतः दापोडी परिसरातील भुयारी मार्गात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्यामुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. काही ठिकाणी वाहतूक मंदावली तर काही रस्त्यांवर पाणी साचल्याने नागरिकांना पायी चालणेही कठीण झाले.

स्थानिक नागरिकांकडून प्रशासनाच्या निष्काळजीपणावर नाराजी व्यक्त करण्यात येत असून, दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची कामे वेळेत पूर्ण करण्याची मागणी होत आहे. अचानक पडणाऱ्या पावसामुळे शहरातील पायाभूत सुविधांची वास्तविक स्थिती समोर येत असून, तातडीने उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. दरम्यान, आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने नालेसफाई आणि पाणी निचऱ्याची कामे तातडीने हाती घ्यावीत, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.






















Join Our Whatsapp Group